पुणे : सोमवारी (13 मे 2024) दुपारी झालेल्या अवकाळी पावसामुळे (Unseasonal Rain)  मुंबईला मोठा तडाखा बसला. घाटकोपर (Ghatkpor)  इथे वादळी वाऱ्यामुळे एका पेट्रोल पंपावर महाकाय होर्डिंग कोसळलं. या अपघातात 14 जणांचा मृत्यू झाला असून तर 75  जण जखमी झाले आहेत. याच अपघाताचा धसका पुणे महापालिकेने घेतला आहे. पुण्यात अशा प्रकारची कोणतीही घटना होऊ नये, म्हणून पुणे महापालिका अलर्ट मोडवर आली आहे. 


पुणे शहरात एकूण 1564 अनधिकृत होर्डिंग्सवर पुणे महापालिकेने (PCM) कारवाई केली आहे. शहरतील सगळया होर्डिंगस ऑडिट करण्याचे आयुक्तांनी आदेश दिले आहेत. शहरात एकूण 2500 होर्डिंग्स आहेत. या सगळ्या होर्डिंग्सची माहिती घेण्याचं काम सुरु आहे.  जर अनधिकृत असेल तर त्याच लायसन्स रद्द करून कारवाई करणार आहेत. जे नीट नाहीत आणि धोकादायक आहेत. त्यावर कारवाई करण्याचे आदेशदेखील देण्यात आले आहेत. 


2500 परवानग्या आहेत. मात्र तेवढेत अनधिकृतदेखील आहेत. याची सगळी चौकशी करणं सुरु आहे. अनधिकृत असेल तर थेट गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. 2598 अधिकृत होर्डिंग्स आहे. शहरात फक्त 85 अनधिकृत होर्डिंग्स आहेत. त्यात हडपसरमध्ये सगळ्यात जास्त अनधिकृत होर्डिंग्स आहेत. 2300 होर्डिंगसचं ऑडिट झालं आहे. त्यातील आतापर्यंत एकूण 1564 अनधिकृत होर्डिंग्सवर पुणे महानगरपालिकेकडून कारवाई करण्यात आली आहे. येत्या काळात होर्डिंग्सवर कारवाई करण्यात येणार आहेत. ऑडिट करण्यासाठी पुणे महापालिकेने कंबर कसली आहे. 


अवकाळी पावसामुळे आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळे पुण्यात अनेकदा होर्डिंग्स पडल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यात अनेक जणांचा जीवदेखील गेला आहे. मात्र काही काळापूर्ती या सगळ्या होर्डिंग्सवर कारवाई केली जाते. त्यानंतर कारवाई थंड होते. अजून अशा काही घटना घडल्या की पुन्हा कारवाईचा फास उगारला जातो. आता मुंबईची घटना झाल्याने पुन्हा एकदा महापालिकेला जाग आली आहे. त्यांनी थेट कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.


अनधिकृत होर्डिंग्स असल्याचं दिसल्यास  त्यावर करावाई करण्यात येणार आहे. त्यांच्यावर दंडाचीदेखील कारवाई करण्यात येणार आहे. सोबतच कधीपासून हे होर्डिंग्स लागलं आहे. हे पाहून त्यानुसार टॅक्स वसूल करण्यात येणार आहे. 


इतर महत्वाची बातमी-


Pune Crime News : ज्योतिषींनीच गंडवलं! जादुटोण्याच्या नावाने पुण्यात महिलेला घातला 15 लाखांचा गंडा


Pune Loksabha Election : कसबा अन् कोथरुड ठरवणार पुण्याचा खासदार? वाढलेल्या आकडेवारीचा कोणाला फटका बसणार?