पुणे : पुणे लोकसभा निवडणुकीसाठी (Pune Loksabha Election 2024) मतदार पार पडलं. मुरलीधर मोहोळ, रवींद्र धंगेकर आणि वसंत मोरे या तिन्ही उमेदवारांचं भवितव्य मतपेटीत बंद झालं आहे. त्यात पुण्यात संध्याकाळी सहावाजेपर्यंत 50.50 टक्के मतदान पार पडलं. 50.50 टक्के जरी मतदान पार पडलं असलं तरीदेखील पुण्यात कोणत्या मतदारसंघात कोणत्या विधानसभा मतदार संघात किती टक्के मतदान झालं. यावर पुण्याचा खासदार कोण होणार?, हे अवलंबून आहे. त्यात कसबा आणि कोथरुड विधानसभा मतदारसंघातील मतदानाची टक्केवारी गेम चेंन्जर ठरण्याची शक्यता आहे. कसबा आणि कोथरुड दोन्ही विधानसभा मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला मानला जातो मात्र विधानसभा पोटनिवडणुकीत रवींद्र धंगेकरांनी दाखवलेल्या करिश्म्यामुळे यंदा कसबा मतदार संघातील मतदान महत्वाचं ठरणार आहे. 

  
पुणे लोकसभा मतदास संघात कोथरूड, पर्वती, शिवाजीनगर, पुणे कॅन्टोन्मेंट आणि वडगाव शेरी हे विधानसभा मतदारसंघ आहेत. त्यात सहाही विधानसभा मतदार संघात भाजपची बऱ्यापैकी पकड आहे. यात कसबा आणि कोथरुडमधील या दोन्ही विधानसभा मतदार संघाची सध्याची आकडेवारी बघितली तर कोथरुडपेक्षा कसब्यात झालेल्या मतांची टक्केवारी जास्त आहे. कसब्यात सरासरी 57.90 टक्के मतदान पार पडलं आहे तर कोथरुडमध्ये 49.10 टक्के सरासरी मतदानाची नोंद झाली आहे. मात्र या मतदानाची अंतिम आकडेवारी अजून जाहीर व्हायची आहे. अंतिम आकडेवारी वाढण्याची शक्यता आहे. त्या अंतिम आकडेवारीत नेमकं कोणत्या मतदारसंघात कोणत्या मतदार संघाची आकडेवारी वाढते, यावर दोन्ही उमेदवारांचं भवितव्य अवलंबून असणार आहे. 


पुण्यात सकाळच्या सुमारास मतदानासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. प्रत्येक विधानसभा मतदारसंघात गर्दी पाहायला मिळाली. दुपारच्या सुमारासदेखील गर्दी ओसरली नव्हती. मात्र त्यानंतर काही प्रमाणात मतदानाची टक्केवारी घसरली.  3 वाजेपर्यंत पुणे लोकसभा मतदारसंघात 33.7 टक्के मतदानाची नोंद झाली होती. यात कोथरुड विधानसभा मतदार संघात 37.2, वडगावशेरी विधानसभा मतदार संघात 26.61 टक्के, कोथरुड विधानसभा मतदार संघात 37.2 टक्के, पर्वती विधानसभा मतदार संघात 27.14 टक्के तर कसबा विधानसभा मतदार संघात 35.23 टक्के मतदानाची नोंद झाली होती. त्यासोबतच मावळ 36.54 टक्के मतदानाची नोंद झाली होती आणि शिरुर लोकसभा मतदारसंघात  36.43 टक्के मतदानाची नोंद झाली होती. त्यानंतर पाच वाजेपर्यंत कसबा पेठ - 51.07%, कोथरूड - 48.91%, पर्वती - 46.80%, पुणे कॅन्टोन्मेंट - 44.01%, शिवाजीनगर - 38.73%, वडगाव शेरी - 40.50% मतदानाची नोंद झाली होती. 


कसबा कोणाचा, कोथरुड कोणाचं?


पुण्यात कोथरुड आणि कसबा मतदार संघ भाजपचा बालेकिल्ला मानता जातो. त्यात सहा विधानसभा मतदारसंघात पाहिलं कसबा सोडला तर बाकी पाच मतदारसंघात महायुतीचे आमदार आहेत. कसबा देखील भाजपचा बालेकिल्ला मानला जायचा मात्र कसब्याचे खासदार गिरीश बापट यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत कॉंग्रेसने भाजपच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावला आणि रवींद्र धंगेकर इथून विजय खेचून आणला. त्यामुळे भाजपला बालेकिल्ला असला तरीही इथे धंगेकरांना मानणारादेखील मोठा वर्ग आहे. त्यामुळे आता कसब्यातील मतदान गेमचेंन्जर ठरु शकतो. वाढीव मतदान नेमकं कुणाचं भवितव्य ठरवतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. 


इतर महत्वाची बातमी-


मुख्यमंत्री झाल्यानंतरही उद्धव ठाकरेंच्या मनात भाजपसोबत जाण्याची इच्छा होती , 'माझा व्हिजन'मध्ये सुनील तटकरेंचा गौप्यस्फोट