पुणे: भोसरीतील सद्गुरुनगर परिसरात पाण्याची टाकी अचानक कोसळल्यामुळे तीन कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाला. हे कामगार लेबर कॅम्पमध्ये राहतात. बाहेरील राज्यातून आलेली अनेक कुंटूब या परिसरात राहतात. त्यांच्यासाठी बांधण्यात आलेली पाण्याची टाकी कोसळल्यामुळे तीन जणांचा मृत्यू झाला. माहिती मिळताच घटनास्थळी आपत्कालीन पथकांनी घटनास्थळी धाव घेतली, बचाव कार्य सुरू केले. प्रशासनाकडून या घटनेचा तपास सुरू करण्यात आला, दुर्घटनेच्या कारणांचा शोध घेतला जातो आहे. मात्र या ठिकाणी राहणाऱ्या इतर नागरिकांनी रोष व्यक्त केला आहे. 


यावेळी प्रत्यक्षदर्शींने माध्यमांशी बोलताना सांगितले, याठिकाणी पाण्याची मोठी समस्या होती. १२०० ते १३०० जण या लेबर कॅम्पमध्ये राहतात. त्यांच्या पाण्याची सुविधा नसल्याने ही पाण्याची टाकी बांधण्यात आली होती. ही टाकी १० ते १२ फुटांची होती. दोन तीन दिवस आधी ही टाकी बांधण्यात आली होती. या टाकीला १० ते १२ नळ होते. आम्ही खुप लोक आहोत, त्यामुळे ४.३० वाजल्यापासून लोक याठिकाणी येतात, लोक टाकीजवळ अंघोळ करण्यासाठी आले. त्यावेळी त्या टाकीच्या नळाला असलेले वाल लांब निघून पडले. त्यांचा आवाज आला, त्यानंतर टाकी पडल्याचा आवाज आला आणि इथं असलेल्या अनेकांनी आरडाओरड केली, त्यानंतर सर्वांनी येऊन बचावकार्य सुरू केलं. त्यामध्ये १० ते १५ जण अडकले होते. 


यामध्ये अनेक जण जखमी झाले, काहींना उपाच मिळाले नाहीत, त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. कंपनीशी संबधित अधिकारी किंवा कोणी याठिकाणी आले नव्हते. यामध्ये मृत झालेले बचावले असते, जर घटनास्थळी लवकर रूग्णवाहिका लवकर आली असती. जे मृत आहेत, त्यांना उपचार मिळाले असते तर ते बचावले असते. त्यांना मदत मिळाली पाहिजे होती. प्रशासन त्यांचे काम आता करत आहेत. त्या टाकीचे काम चांगल्या पध्दतीचे झाले नव्हते, ही घटना निष्काळजीपणामुळे झाली आहे. त्या टाकीमध्ये कोणत्याही प्रकारचे पिलर टाकले नव्हते, ती ओली होती, ती चांगल्या पध्दतीने बनवली गेली नव्हती, त्यामुळे ही दुर्घटना घडली असल्याची ठपका या ठिकाणी वास्तव्यास असलेल्या प्रत्यक्षदर्शींनी ठेवला आहे. 


कोणी बिहार, ओडीसा, बंगाल, या ठिकाणावरून कामासाठी आले आहेत, ज्या घरातील व्यक्तीचा या दुर्घटनेत मृत्यू झाला त्यांच्या कुंटूबियांना मदत मिळाली पाहिजे. त्यांच्या घरातील सदस्यांचे हाल होऊ नयेत याची काळजी घेतली गेली पाहिजे असंंही यावेळी त्यांनी म्हटलं आहे,


तात्पुरत्या स्वरूपाची सोय म्हणून बांधलेली पाण्याची टाकी अचानक कोसळली, या दुर्घटनेत 3 कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. हे कामगार लेबर कॅम्पमध्ये वास्तव्यास होते. आज (गुरूवारी) सकाळच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली. आपत्कालीन पथकांनी घटनास्थळी धाव घेतली असून, बचाव कार्य सुरू आहे. प्रशासनाकडून या घटनेचा तपास सुरू असून, दुर्घटनेच्या कारणांचा शोध घेतला जात आहे. तर या ठिकाणी असलेल्या इतर कामगारांनी आणि प्रत्यक्षदर्शींंनी ही घटना टाकी नुकतीच बांधली असून त्यात पाणी भरल्याने टाकी कोसळून दुर्घटना झाल्याचं म्हटलं आहे. 


या दुर्घटनेत तीन मजूर ठार झाले आहेत, तर सात जण जखमी झाले, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. पिंपरी चिंचवड शहरातील भोसरी भागात काही मजूर पाण्याच्या टाकीखाली आंघोळ करत असताना ही घटना घडली, संबधित घटनेची माहिती मिळाल्यानंतर, पोलिस आणि अग्निशामक दल, तात्काळ घटनास्थळी दाखल झाले, त्यांनी बचावकार्य केले. पाण्याच्या टाकीच्या कोसळण्याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे, परंतु या घटनेमुळे बांधकामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. प्रशासनाने या दुर्घटनेची चौकशी सुरू केली असून संबंधित कंत्राटदारावर कारवाई होण्याची शक्यता आहे.


अजित पवारांची घटनेबाबतची प्रतिक्रिया


या घटनेबाबत पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी सोशल मिडियावरती पोस्ट लिहली आहे. "भोसरीच्या सद्गुरू नगर परिसरातील पाण्याची टाकी कोसळून तीन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुःखद आणि वेदनादायी आहे. मृत्यू पावलेल्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. या दुर्घटनेत पाच ते सात कामगार टाकीखाली अडकल्याची भीती आहे. पोलीस आणि अग्निशमन दलाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून बचाव कार्य युद्ध पातळीवर सुरू आहे. संबंधित अधिकाऱ्यांकडून वेळोवेळी माहिती घेतली जात असून आवश्यक त्या सूचना दिल्या जात आहेत",अशी माहिती त्यांनी यावेळी दिली आहे.