Accident News: पिंपरी चिंचवडमधून मोठी बातमी समोर आली आहे. पिंपरी चिंचवडमध्ये पाण्याची टाकी कोसळल्याची दुर्घटना घडली आहे. टाकीच्या ढीगाऱ्याखाली अनेकजण अडकल्याची प्राथमिक माहिती समोर आली होती. त्यातील दोन ते तीन दगावले असण्याची भीती ही व्यक्त केली जात होती. भोसरीच्या सद्गुरू नगरमध्ये ही घटना आज(गुरूवारी) सकाळी घडली आहे. अग्निशमन दल आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले, त्यांनी तत्काळ बचावकार्य करत जखमींना तातडीने उपचारांसाठी रूग्णालयात दाखल केले आहे.


पिंपरी चिंचवड येथे भोसरी सद्गुरूनगर येथे पाण्याची टाकी कोसळल्याने ही भीषण दुर्घटना घडली. यामध्ये 3 बिगारी कामगारांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. घटनास्थळी बचावकार्य, अँब्युलन्स तसेच अग्निशमन दलाचे जवान, बचाव पथकाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. याठिकाणी मोठी गर्दी जमली आहे.


तात्पुरत्या स्वरूपाची सोय म्हणून बांधलेली पाण्याची टाकी अचानक कोसळली, या दुर्घटनेत 3 कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. हे कामगार लेबर कॅम्पमध्ये वास्तव्यास होते. आज (गुरूवारी) सकाळच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली. आपत्कालीन पथकांनी घटनास्थळी धाव घेतली असून, बचाव कार्य सुरू आहे. प्रशासनाकडून या घटनेचा तपास सुरू असून, दुर्घटनेच्या कारणांचा शोध घेतला जात आहे. तर या ठिकाणी असलेल्या इतर कामगारांनी आणि प्रत्यक्षदर्शींंनी ही घटना टाकी नुकतीच बांधली असून त्यात पाणी भरल्याने टाकी कोसळून दुर्घटना झाल्याचं म्हटलं आहे. 


या दुर्घटनेत तीन मजूर ठार झाले आहेत, तर सात जण जखमी झाले, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. पिंपरी चिंचवड शहरातील भोसरी भागात काही मजूर पाण्याच्या टाकीखाली आंघोळ करत असताना ही घटना घडली.


संबधित घटनेची माहिती मिळाल्यानंतर, पोलिस आणि अग्निशामक दल, तात्काळ घटनास्थळी दाखल झाले, त्यांनी बचावकार्य केले. पाण्याच्या टाकीच्या कोसळण्याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे, परंतु या घटनेमुळे बांधकामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. प्रशासनाने या दुर्घटनेची चौकशी सुरू केली असून संबंधित कंत्राटदारावर कारवाई होण्याची शक्यता आहे.