Pune Gas Cyclinder Blast: पिंपरी चिंचवडमध्ये घरगुती गॅसचा स्फोट झाल्याची घटना घडली आहे. घरगुती गॅसचा स्फोटामध्ये पाच जण जखमी झाले आहेत. ही घटना आज सकाळी पिंपरीच्या बौद्ध नगरमध्ये घडली आहे. होरपळलेल्या पाच ही रुग्णांना आधी पालिकेच्या वायसीएम रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे, त्यानंतर पुढील उपचारासाठी ससून रुग्णालयात हलविण्यात येत आहे. गॅस स्फोटानंतर आग न लागल्यानं स्थानिकांनी याबाबत अग्निशमन दलाला कल्पना दिलीच नाही. आता हा स्फोट नेमका कशामुळं झाला, याचं कारण शोधलं जातं आहे.
गॅस स्फोटमध्ये जखमी झालेल्यांची नावे
1) मनोज कुमार वय 19
2) धीरज कुमार वय 23
3) गोविंद राम वय 28
4) राम चेलाराम वय 40
5) सत्येंदर राम वय 30
हा भीषण स्फोट गॅस पाईप लिक झाल्यानं झाला असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. स्फोटात जखमी झालेल्यांना उपचारांसाठी वायसीएम रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र, पुढील उपचारासाठी ससून रुग्णालयात हलविण्यात येत आहे.