How to Clean and Speed Up Your Laptop : सध्या आपण प्रत्येकजण दिवसातले अनेक तास लॅपटॉपवर काम करत असतो. 8 ते 9 तासांपैकी अधिक वेळ आपण लॅपटॉपवर घालवत असतो. त्यामुळे लॅपटॉपच्या बॅटरीवरदेखील परिणाम होतो किंवा लॅपटॉप स्लोदेखील होतो. मात्र हाच लॅपटॉप चांगला काम करावा. यासाठी काही महत्वाच्या टिप्स....


अशी वाढवा तुमच्या लॅपटॉपची लाईफ-


तज्ज्ञांच्या मते तुमच्या लॅपटॉपचे सरासरी आयुर्मान  हे जवळपास 4-5 वर्ष असते पण या टिप्सचा वापर करून  आपल्या लॅपटॉपचे आयुष्य वाढवू शकतो. 


1. असा करा तुमचा लॅपटॉप क्लिन- 


तुमच्या लॅपटॉप आणि कम्पुटरच्या प्रोसेसींग युनिटसह आतील भाग आपण वेळोवेळी साफ करणे गरजेचे असते, असं केल्याने त्या हार्डवेअरला गंज लागण्याची शक्यता कमी असते आणि त्यासोबतच शॉर्टसर्किटची समस्या देखील उद्भवत नाही. 


2. लॅपटॉपच्या हिटवर नियंत्रण ठेवा- 


लॅपटॉपच्या हिटवर नियंत्रण ठेवण्यासाठी लॅपटॉप चार्ज करतेवेळी लॅपटॉपचा वापर करणे शक्यतो टाळावं. यासोबतच आपण ज्याठिकाणी लॅपटॉप ठेऊन काम करतो त्याठिकाणी लॅपटॉपसाठी पुरेशी मोकळी हवा किंवा पुरेस थंड वातावरण असणे गरजेचे आहे. यामुळे तुमच्या लॅपटॉपच्या बॅटरीचे आयुष्य वाढते आणि या सोबतच दुसरी कोणतीही समस्या येत नाही. 


3. अँटीव्हायरस प्रोग्रामचा वापर- 


तुमच्या सिस्टमला व्हायरसपासून संरक्षण करण्यासाठी तुमच्या लॅपटॉप किंवा कॅम्पुटरमध्ये अँटीव्हायरस असणे आवश्यक आहेत. जेणेकरून तुमच्या सिस्टिमला जास्तीत-जास्त संरक्षण मिळू शकते आणि याद्वारे तुमचा लॅपटॉप व्हायरसपासून सुरक्षित राहू शकतो. तर आपला व्हायरस अद्ययावत आहे कि नाही याचीदेखाल  खात्री आपण करून घ्यायला हवी. 


4. प्रोसेसर ओव्हरलोड करू नका- 


तुमचा लॅपटॉप किती जलद चालतो आणि युजर्सच्या इनपुटला तो कसा प्रतिसाद देतो यात प्रोसेसरची मोठी भूमिका असते. म्हणून, जितका आवश्यक असेल तितकाच भार तुमच्या लॅपटॉपच्या प्रोसेसरला द्या. तुम्ही तुमचा लॅपटॉप जर गेमिंग किंवा हेवी-ड्युटी टास्कसाठी वापरत असाल ओव्हरलोड होऊ नये याची काळजी घ्या.



5. सॉफ्टवेअर अपडेट सह करा लॅपटॉपची देखभाल-


तुमच्या लॅपटॉपमध्ये असणारे सर्व सॉफ्टवेअर्स अपडेट आहेत की नाही याची खात्री करा आणि यासोबतच तुमच्या लॅपटॉपचीदेखील नियमितपणे देखभाल करा.  या घटकांचा वापर केल्यास आपल्याला कोणत्याही प्रकारच्या अडचणींना सामोरे जाण्याची गरज नाही. 



वरील या सर्व टिप्सचा वापर करून तुम्हीदेखील तुमच्या लॅपटॉपचे आयुष्य वाढवू शकता आणि सोबतच त्याची देखभालदेखील करू शकता.


इतर महत्वाची बातमी- 


Bumper Discount On Asus Product : बजेटचं टेन्शन सोडा, ASUS च्या गॅजेट्सवर धमाकेदार दिवाळी ऑफर्स, वाचा संपूर्ण ऑफर्स एका क्लिकवर...