Bumper Discount On Asus Product : दिवाळीमध्ये (Diwali Offers) अनेकांचा कल खरेदीकडे दिसून येतो. अनेकजण मुहूर्त बघून तर अनेकजण वेगवेगळे (Discout) डिस्काउंट (Electronic Gadgets) पाहून देखील निरनिराळ्या वस्तू आणि इलेक्ट्रॅनिक गॅजेट्स खरेदी करत असतात. यात कपडे, इलेक्ट्रॉनिक, फर्निचर अशा अनेक गोष्टींचादेखील समावेश असतो. संधी साधत आपल्या ग्राहकांसाठी नवनवीन प्रकारची ऑफर्स आणि भरघोस (Asus Electronic Gadgets) सुट देत असतात. अशीच एक डिल Asus या इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स बनवणाऱ्या कंपनीने दिवाळीनिमित्त आपल्या ग्राहकांसाठी लॉन्च केली आहे. हे प्रोडक्ट्स कोणते आहेत आणि किती टक्के सुट मिळणार आहे, पाहुयात...
या आहेत बंपर दिवाळी ऑफर्स-
Asus या कंपनीने त्यांच्या नवीन लॅपटॉप्सवर मोठा डिस्काउंट दिलेला आहे. यासोबतच गेमिंग कंसोल, माउस, कीबोर्ड अशा वेगवेगळ्या गॅजेट्सवरसुद्धा मोठी सूट असल्याचं पाहायला मिळत आहे. गेमिंगमध्ये आवड असणाऱ्या लोकांना या ऑफर्स फायदा होणार आहे. अनेक लोक या ऑफर्स पाहून गॅजेट्स खरेदीदेखील करताना दिसत आहे.
Asua ROG Ally- AMD Ryzen Z1
Asua ROG Ally- AMD Ryzen Z1 या लॅपटॉपमध्ये तुम्हाला फुल एचडी टचस्क्रीन डिस्प्ले,एक्सट्रीम प्रोसेसर या सोबतच 16 जीबी रॅम आणि 512 जीबी PcleGen 4 स्टोरेज, या सर्व फॅसिलिटीज् सह तुम्हाला हा लॅपटॉप या ऑफरमध्ये 69,990 रुपयांमध्ये मिळणार आहे.
Asus Zenbook S 13 OLED-
या लॅपटॉपमध्ये 32 जीबी रॅम,1 टीबी एसएसडी आणि 13th जनरेशन चा इंटेल कोर i7 प्रोसेसर यासह 2.8k Asus ल्यूमिना OLED पॅनल, एचडी ट्रू ब्लैक 500 आपल्याला या ग्राफिक्ससाठी उपयोगी येतात. या सर्व सुविधांसह हा लॅपटॉप तुम्हाला रुपये 1,04,990 या विशेष किमतीतउपलब्ध होणार आहे.
Asus Vivobook S 15 OLED
Asus Vivobook S 15 OLED - या लॅपटॉपमध्ये तुम्हाला 15.6 इंचाचा 2.8k OLED डिस्प्ले मिळणार आहे. यासोबतच 16 जीबी रॅम एसएसडी स्टोरेजसह या ऑफरमध्ये आपल्याला 86,990 रुपयांमध्ये मिळणार आहे.
Asus Chromebook CX1
Asus Chromebook CX1 सीरीज- हा क्रोमबुक लॅपटॉप आहे यामध्ये आपल्याला वाय फाय, फूल एचडी टचस्क्रीन डिस्प्ले सोबत हा लॅपटॉप तुम्हाला 18,990 रुपयांमध्ये मिळणार आहे. यासह अजून विविध गॅजेट्सवर बंपर सुट देण्यात आली आहे. त्यामुळे यंदाची दिवाशी टेक्नोसॅव्ही तरुणांनासाठी पर्वणी ठरणार आहे.
इतर महत्वाची बातमी-
Dhanteras : दिवाळी दागिने खरेदी करण्यापेक्षा सोने खरेदीच्या 'या' पर्यायांमध्ये गुंतवणूक करा