महाराजस्व अभियानांतर्गत 'शासन आपल्या दारी' या खास कार्यक्रमाचे आयोजन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या उपस्थितीत इंदापुर तालुक्यातील भिगवण येथे करण्यात आले. सुप्रिया सुळे म्हणाल्या, या तालुक्यात लाल दिवा नेहमीच असतो. मात्र हे दुर्दैव आहे की, नरेंद्र मोदींनी तुमच्या गाडीवरील लाल दिवा काढून घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींना एक दिवस काय वाटले काय माहित आणि ते म्हणाले की, आता लाल दिवे कोणीचं वापरायचे नाही. मात्र यामुळे सामान्य नागरिकाला मंत्री आले गेलेले काहीचं कळत नाही. शिवाय ते कोणत्या गाडीत आहेत हेही समजत नाही.
Kolhapur | उच्चशिक्षित तरूणीचा शेतकरी तरूणाशीच लग्न करण्याचा निर्णय, लग्नाला शिक्षक पित्याचाही होकार
काही दिवसापूर्वी चंद्रकांत पाटील यांनी महाराष्ट्र विकास आघाडी सरकार बाबत एक भाकित केले होते. डिसेंबरमध्ये मध्यवर्ती निवडणुका होतील असे भाकीत चंद्रकांत पाटील यांनी केले होते. यासंदर्भात सुप्रिया सुळे यांना विचारले असता सुप्रिया सुळे यांनी चंद्रकांत पाटील व भाजपवर जोरदार टीका केली आहे.
भाजप नेत्यांच्या मनात काहीतरी कट-कारस्थान दिसत आहे ही बाब दुर्दैवी आहे. एखादं सरकार ज्यावेळी निवडून येते. ते पाच वर्षासाठी काम करते, आम्ही अनेक वेळा विरोधात बसलो होतो. मात्र सरकार पाडण्याचे उद्योग आणि महाराष्ट्राच्या जनतेला अडचणीत टाकून पुन्हा निवडणूक खर्च करण्याचे उद्योग नाही केले व असली पापाची कामे आम्ही कधी केलेली नाहीत व कधी करणारही नाही. सध्या जे विरोधात बसलेले आहे त्यांना सत्तेशिवाय रहाणं अडचणीचं होत असल्याचं दिसतं आहे. काहीही करून सत्ता आणायची आणि वेळ पडली तर महाराष्ट्राच्या जनतेला अडचणीत आणायचे, निवडणुका घ्यायच्या व काहीही करून सत्येत कसे यायचे हेच प्रयत्न त्यांचे दिसत आहेत. त्यामुळे ही बाब दुर्देवाची आहे 'उनसे ये उमीद नही थी' असे म्हणत भाजप प्रदेशाध्याक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका केली आहे.
संबंधित बातम्या :
काँग्रेसनं शिवसेनेला हिंदुत्वापासून दूर नेलं :चंद्रकांत पाटील
भाजपकडून उदयनराजे भोसले, रामदास आठवले यांना राज्यसभेत पाठवण्यावर शिक्कामोर्तब?