जेजुरी, पुणे : बारामती लोकसभा मतदार (Baramati Loksabha Constituency) संघाच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे (Supriya Sule)  यांचा दणक्यात प्रचार सुरु आहे. बारामती काबीज करण्यासाठी त्या पब्रत्येक गाव पिंजून काढताना दिसत आहे. प्रत्येक गावातील नागरिकांच्या समस्या जाणून घेताना दिसत आहेत आणि मतदानाचं आवाहन करताना दिसत आहे. त्यातच मतदानासाठी त्यांनी बेरोजगारीचा मुद्दा समोर आणला आहे. बेरोजगारीच्या मुद्द्यावर आणि घराणेशाहीच्या मुद्द्यावर त्या नेहमीच भाष्य करत असतात. जेजुरीत प्रचारादरम्यानदेखील सुप्रिया सुळेंनी बेरोजगारीच्या मुद्द्यावर पुन्हा भाष्य केलं आहे आणि सरकारवर निशाणा साधला आहे.  IIT मध्ये शिकूनही नोकरी मिळत नाही, तर सर्वसामान्यांनी काय करायचं?, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. 


सुप्रिया सुळे म्हणाल्या की, गेले अनेक आठवडे आपण सगळे केंद्र सरकारचे सर्व्हेत आणि माहिती येथे त्याच्यात सातत्याने गेले दीड-दोन वर्षाच्या  कोरोना काळ आम्ही समजू शकतो. मात्र पूर्णपणे बेरोजगारीचा प्रश्न सुटलेला नाही. IIT आणि IIM  मध्ये शिकतलेल्या तरुणांसमोरदेखील नोकरीचं मोठं आव्हान आहे. या मुलांपैकी 34 टक्के तरुणांना नोकऱ्या मिळत नाही आहे. ही बाब चिंताजनक असल्याचं सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत. आयआयटीसारख्या किंवा उच्च शिक्षण घेतलेल्या तरुणांसमोर जर बेरोजगारीचं संकट असेल तर सर्वसामान्य जनतेने काय करायचं असा प्रश्न देखील सुप्रिया सुळेंनी उपस्थित केला आहे. 



यंदाची लोकसभा निवडणूक अनेक अर्थांनी वेगळी आहे. कारण या निवडणुकीच्या आधी राष्ट्रवादी, शिवसेना या पक्षांचे दोन गट पडले आहेत. नेते, कार्यकर्ते दोन गटांत विभागले गेले आहेत. लोकसभेच्या अनेक जागांवर तर राष्ट्रवादी, शिवसेना या पक्षांच्या दोन्ही गटांत थेट लढत होणार आहे. काहीही झालं तरी आमचाच विजय होणार, असं प्रत्येजकण सांगतोय. सध्याच्या प्रचाराच्या काळात कधीकाळी एकाच पक्षात असलेले नेते एकमेकांवर टीका करताना दिसतायत. त्यात सुप्रिया सुळेदेखील टीका करताना दिसत आहे. 


युगेंद्र पवार यांच्या उपस्थितीत बारामतीतील रुईत पदयात्रेचे आयोजन


बारामती लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने सुप्रिया सुळे यांच्या प्रचारार्थ युगेंद्र पवार यांच्या उपस्थितीत पदयात्रेचे आयोजन करण्यात आले. युगेंद्र पवार यांनी यावेळी सुप्रिया सुळे यांच्या प्रचाराचे पत्रक वाटून नागरिकांच्या भेटी गाठी देखील घेतल्या.


 इतर महत्वाच्या बातम्या-


-Dharashiv Lok Sabha : धाराशिवचा तिढा सुटला, तानाजी सावंत एक पाऊल मागे? भाजपच्या आमदाराच्या पत्नीची वर्णी लागण्याची शक्यता


-Ram Satpute : सोलापुरात विमानतळ अन् आयटी पार्क उभारणार, सोलापूर भाजपचे उमेदवार राम सातपुते यांचा शब्द