Supriya Sule on Devendra Fadnavis : "एक महिन्यापूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) फलटणला (Phaltan) गेले होते. त्यावेळी त्यांनी एक आरोप केला होता. देवेंद्र फडणवीस म्हणत होते की, या भागात पाणी चोर आहे. या पाणी चोरीवर मी बंदी आणणार आहे. 23 वर्षे पाणी चोरी चालली. आता ही चोरी मी बंद करणार आहे. मी लोकप्रतिनिधी आणि महिला म्हणून जाहिर प्रश्न विचारते की, तुम्ही फलटणमध्ये म्हणालात की,. 23 वर्षे येथे पाण्याची चोरी होते. कोणत्या पाण्याची चोरी होते. कोण करतय. गेल्या साडेसहा वर्षात चोरी होत होती. मात्र, अस काय झालं की, 23 वर्षांची चोरी आठवली. तुमच्यात हिंमत असेल तर नाव घेऊन बोला आणि कोठे पाणी चोरी होत आहे, हेही जाहिर करा", असं खुलं आव्हान सुप्रिया सुळे यांनी देवेंद्र फडणवीस यांना दिले आहे. पुरंदर तालुक्यात शरद पवार गटाचा कार्यकर्ता मेळावा पार पडला. यावेळी खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) बोलत होत्या. 


पाच वर्ष काय डोळे झाकून बसले होतात का?


सुप्रिया सुळे म्हणाल्या, गुंजवडीचा पाण्याचा तुम्ही उल्लेख केला. एक महिन्यापूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस फलटणला गेले होते. त्यावेळी त्यांनी एक आरोप केला होता. तो आरोप जास्त चर्चिला गेला नाही. फक्त वर्तमान पत्रात एकदिवस आला. चॅनल्सवरही एकदा दिवस आला असेल. देवेंद्र फडणवीस म्हणत होते की, या भागात पाणी चोर आहे. या पाणी चोरीवर मी बंदी आणणार आहे. 23 वर्षे पाणी चोरी चालली. आता ही चोरी मी बंद करणार आहे. 23 वर्षे एक माणूस चोरी करतोय. तुम्ही या आधी या राज्याचे मुख्यमंत्री होता. गृहमंत्रीही राहिलेले आहात. मग ते पाच वर्ष काय डोळे झाकून बसले होतात का? असा सवाल शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी देवेंद्र फडणवीसांना केला आहे. 


देवेंद्र फडणवीसांचा आण्णाजी पंत म्हणून उल्लेख 


देवेंद्र फडणवीसांचं कस आहे खडा टाकायचा आणि पळून जायच, अशी टीकाही सुळे यांनी केली. यावेळी देवेंद्र फडणवीसांचा आण्णाजी पंत म्हणून सुळेंनी उल्लेख केलाय. मी रोज त्यांच्यावर हल्ला चढवते. मात्र, आता त्यांच्याकडून काहीच टीका होत नाहीत. त्यांना माझा वाईटपणा घ्यायचा नाही ते दुसऱ्यांना बोलायला लावतात. मी ठरवलंय महाराष्ट्रात कोणाशी लढणार नाही. माझी महाराष्ट्रात कोणाशी लढाई नाही. माझी लढाई दिल्लीशी आहे. मेरिटवर आहे त्याच्याशी लढायच. इथ लढण्यात पॉईंट नाही. कारण स्क्रिप्ट तेच लिहित आहे. अदृश्य शक्तीशी लढूयात. प्रश्नाच्या मुळावर जाव लागत, असेही सुळे यांनी यावेळी बोलताना नमूद केले. 


काय म्हणाले होते देवेंद्र फडणवीस?


फलटण तालुक्याला 23 वर्षांनी (phaltan water issue) हक्काचं पाणी मिळतंय, अनेक प्रकारच्या चोऱ्या पाहिल्या, पण पाण्याची चोरी पाहिली नव्हती. मी राज्याचा गृहमंत्री असल्यानं चोरी केलेल्याला पकडण्याचं काम माझ्या खात्याचं आहे, त्याला आम्ही पकडूच. फलटण तालुक्याचं पाणी वळवून आपल्या मतदारसंघात नेल्याचा आरोप पश्चिम महाराष्ट्राच्या एका मोठ्या नेत्यावर नेहमी होतो. त्यालाच अनुसरून फडणवीसांनी ही बोचरी टीका केली होती.




इतर महत्वाच्या बातम्या 


गृहखातं माझ्याकडे, फलटणचं पाणी चोरणाऱ्यांना पकडूच, देवेंद्र फडणवीसांचा रोख कोणत्या पवारांकडे?