पुणे : पिंपरी चिंचवड महापालिकेचा 2024-25 या आर्थिक वर्षाचा मूळ 5 हजार 841 कोटी 96 लाख रूपये आणि केंद्र व राज्य शासनाच्या पुरस्कृत योजनांसह 8 हजार 676 कोटी 80 लाख रूपयांचा अर्थसंकल्प महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी स्थायी समितीला आज (दि.20) सादर केला. आगामी लोकसभा, विधानसभा, महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर  कोणतीही करवाढ, दरवाढ करण्यात आलेली नाही. 


या विशेष सभेमध्ये महापालिकेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी प्रवीण जैन यांनी आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांना अर्थसंकल्प सादर केला. प्रशासकांनी अर्थसंकल्पाला तात्काळ मान्यता दिली. महापालिकेचा हा ४२ वा अर्थसंकल्प आहे. तर, आयुक्त सिंह यांचा दुसरा अर्थसंकल्प आहे. यावेळी अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे, विजयकुमार खोराटे, उल्हास जगताप उपस्थित होते.


अर्थसंकल्पाची वैशिष्ट्ये!


• महापालिकेच्या विकास कामासाठी 1863 कोटी तरतूद
• आठ क्षेत्रीय कार्यालयासाठी 190 कोटी
• स्थापत्य विशेष योजनांसाठी 1031 कोटी 79 लाख
• शहरी गरिबांसाठी 1998 कोटी
• महिलांच्या विविध योजनांसाठी 61 कोटी 58 लाख
• दिव्यांग कल्याकणारी योजना 65 कोटी 21 लाख
• पाणीपुरवठा 269 कोटी 89 लाख
• पीएमपीएमएलसाठी 268 कोटी 89 लाख
• भूसंपादनकरिता 100 कोटी
• स्मार्ट सिटीसाठी 50 कोटी रुपये तरतूद


पायाभूत सुविधा प्रकल्प


शहरातील विकास योजनेतील सुमारे 61 कि.मी. लांबीचे रस्ते विकसित करण्यात येणार ( PCMC ) आहेत. त्यातील काही रस्ते डांबरीकरण, काही रस्ते कॉक्रीटीकरण तर काही रस्ते Urban Street Design नुसार विकसित करण्याचे आराखडे तयार करण्यात आले आहेत. महापालिका हद्दीमधील वाकड, पुनावळे, ताथवडे, पिंपळे सौदागर, चिखली, जाधववाडी, बो-हाडेवाडी, मोशी , च-होली, तळवडे, दिघी, डुडुळगाव, वडमुखवाडी, कुदळवाडी या भागातील रस्ते विकसित करण्याचे नियोजन आहे. यामध्ये रस्त्यासोबतच पाणीपुरवठा, जलनिःसारण नलिका टाकणे, विद्युत दिव्यांची व्यवस्था करणे युटीलिटी डक्ट टाकणे इ. सोई सुविधा देणेत येणार आहेत. त्यासोबतच अर्बन स्ट्रीट डिझाईननुसार रस्ते विकसित करणार आहेत. महत्वाचे रस्ते अर्बन स्ट्रीट डिझाईननुसार विकसित करणेत येणार आहे. यामध्ये पादचा-यांसाठी सुसज्ज समपातळीतील पदपथ, सायकल स्वारांकरीता सुरक्षित सायकल मार्ग, नागरीकांना बसणेकरीता बैठक व्यवस्था, दिशादर्शक फलक इ. गोष्टींचा समावेश करण्यात आलेला आहे. 


इतर महत्वाची बातमी-