Supriya Sule on Ajit Pawar : आजवर आपल्यावर अनेक भ्रष्टाचाराचे आरोप होत आलेत, पण आता आपल्यावर भ्रष्टाचाराचे आरोप होत नाहीत. डंके की चोट पर मी सांगते आता आमच्यावर बोलून दाखवा, पण मी अशोक चव्हाणांची बाजू घेऊन तोंडावर पडले. आजवर भाजप त्यांच्यावर घोटाळ्याचे आरोप केले अन चव्हाणांनी अचानक भाजपवासी झाले. सहा वर्षाची राज्यसभा त्यांना मिळाली. इथं मी आणि अमोल कोल्हे खासदार होण्यासाठी वणवण भिंगरी लावून फिरतोय, अन ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले, त्यांना आयती खासदारकी मिळाली, अशा खोचक शब्दात खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजपवर जोरदार टीकास्त्र सोडले.
शिरुरमधील महाविकास आघडीचे उमेदवार अमोल कोल्हेंच्या प्रचारार्थ सुप्रिया सुळे यांनी प्रचार सभा घेतली. सुप्रिया सुळेंनी अजित पवार यांनी केलेल्या टीकेला सुद्धा जोरदार प्रत्युत्तर दिले.
मंत्री पद महत्वाचं की निष्ठा महत्वाची? पुत्री प्रेमाचा पण आरोप केला गेला
सुप्रिया सुळे म्हणाल्या की, आपला पक्ष फुटला, चोरला, वगैरे वगैरे सुरू आहे, पण मी आज तेच म्हणते, प्यार से मांगा होता ना सबकुछ दे देते. नाती तोडायला ताकद लागत नाही, नाती जोडायला ताकद लागते. मंत्री पद महत्वाचं की निष्ठा महत्वाची? हे तुम्हीच सांगा, अशी विचारणा करत सुप्रिया सुळे यांनी अजित पवार यांनी केलेल्या मी त्यांच्या पोटी जन्माला आलो असतो वक्तव्यावर पलटवार केला आहे. त्यांनी सांगितले की, आता मला त्यांचा स्वभाव माहीत आहे. तुम्हीच तुलना करा ना? कोणाला काय मिळालं याचा हिशोब करा. मला काय मिळालं आणि दादांना काय काय मिळालं. सगळं तुमच्या समोर आहे. सगळं स्पष्ट होईल. खूप सोप्प उत्तर आहे.
सुप्रिया सुळे म्हणाल्या की, शिरूर लोकसभेचा आपला उमेदवार एक नंबरचा आहे. अमोल दादा माझ्या भावासारखा आहे. आपल्या पक्षावर भ्रष्टाचाराचे आरोप केले जातात, पण आता आपण मुक्त झालो आहोत. पुत्री प्रेमाचा पण आरोप केला गेला, असेही त्या म्हणाल्या.
अगं बया, मी तर घाबरलेच.
सुळे पुढे म्हणाल्या की, आपले विरोधी उमेदवार म्हणत आहेत, ही माझी शेवटची निवडणूक आहे. मला निवडून द्या. अगं बया, मी तर घाबरलेच, असे म्हणत त्यांनी टोला लगावला. त्यांनी सांगितले की, म्हणजे पुढील पाच वर्षे काम करणार नाहीत. वर्ष मोजत राहतील. मला तर आधी वाटलं होतं, की विरोधी उमेदवार शिवाजी आढळराव माझ्या वडिलांच्या वयाचे असतील. पण मगाशी मला समजलंकी अजित दादा, दिलीप वळसे आणि उमेदवार एकाच वयाचे आहेत, पण त्यांचा आदर करायला हवा. मात्र, ते म्हणतात माझी शेवटची निवडणूक आहे. ऐकून वाईट वाटलं. तुम जियो हजारो साल, साल के दिन हो पचास हजार, असेही त्या म्हणाल्या.
इतर महत्वाच्या बातम्या