Sunil Tingre, Pune : "पुण्यातील अपघातात मृत झालेल्या युवकांच्या आणि कुटुंबियांच्या दु:खात मी देखील सहभागी आहे. मीही त्याबाबत संवेदनशील आहे. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून काही लोक माझ्या प्रतिमेला डाग लावण्याचा प्रयत्न करत आहेत.  मृतांच्या नातेवाईकांना मदत केली होती", असे आमदार सुनील टिंगरे म्हणाले आहेत. गेल्या दोन दिवसांपासून अपघाताबाबत आरोप झाल्यानंतर सुनील टिंगरेंनी पुण्यात पत्रकार परिषद घेत स्पष्टीकरण दिले आहे. 


माझ्या स्वीय सहाय्यकांचा फोन आला


सुनील टिंगरे म्हणाले, रविवारी रात्री 3 वाजून 21 मिनीटांनी रात्री मला माझ्या स्वीय सहाय्यकांचा फोन आला. आपल्या मतदारसंघात कल्याणनगर भागात मोठा अपघात झालाय. त्यानंतर मला विशाल अग्रवाल यांचाही फोन आला. त्यांच्याकडून माहिती देण्यात आली. त्यांनी मला सांगितलं की, माझ्या मुलाचा अपघात झालाय. पब्लिकने त्याला मारहाण गेली आहे. त्यानंतर मी घटनास्थळी गेलो. तिथून पोलीस स्टेशनला गेलो. 


पीआय साहेबांनी दोन युवकांचा मृत्यू झाल्याचे सांगितले


पुढे बोलताना टिंगरे म्हणाले, तिथे समजलं की, लोक जखमींना रुग्णालयात घेऊन गेले आहेत. त्यानंतर पीआय मला म्हणाले मीच 10 ते 15 मिनीटात मीच तिकडे येत आहे. तुम्ही तिथेच थांबा. ते त्याठिकाणी आले आणि मला माहिती दिली. दोन युवकांचा मृत्यू झाल्याचे सांगितले. या केसमध्ये त्यांनी मला गुन्हा दाखल करावा लागेल, असं सांगितलं. मी कुटुंबियांच्या व्यक्तींना सांगितलं की, हे गंभीर आहे. 


सुनील टिंगरेंच्या पत्रकार परिषदेत काय काय म्हणाले?


माझ्या मतदारसंघात घडलेल्या घटनेबद्दल दुःख व्यक्त करतो. रात्री तीन वाजून 21 मिनिटांनी माझ्या पी एचा मला फोन आला की मोठा अपघात झाला आहे. त्यानंतर अनेक कार्यकर्ते असल्याचा आणि विशाल अगरवालव यांचा देखील फोन आला की माझ्या मुलाला मारहाण झाली आहे. मी पोलिस स्टेशनला पोहचलो.  त्यानंतर पोलीसांनी मला माहिती दिली. त्यानंतर मी पोलिसांना कायद्यानुसार कारवाई करायला सांगितलं . मृतांच्या नातेवाईकांशी देखील मी बोललो. मी पब आणि  बारच्या विरोधात निहमीच भूमिका घेतलीये. राजकीय क्षेत्रात प्रवेश करण्या आधी मी त्यांच्याकडे नोकरी करायचो. एवढाच त्यांचा आणि माझा संबंध आहे. मृतांच्या नातेवाईकांना मी मदत केली. मी पोलिस स्टेशनमधील  सी सी टी व्ही  फुटेज खुले करण्याची मागणी करतो आहे.


इतर महत्वाच्या बातम्या 


Gajanan Kirtikar VIDEO : ना नगरसेवक, ना आमदार, आता अमोल डायरेक्ट खासदार होणार; शिंदे गटाच्या गजानन कीर्तिकरांचं मोठं वक्तव्य