Lahu Ughade Succes Story : 'लहरों से डर कर नौका पार नहीं होती,कोशिश करने वालों की हार नहीं होती', ही कविता आतापर्यंत अनेकदा आपल्यातील प्रत्येकाने ऐकली आहे. कविता ऐकून अनेकांना प्रेरणादेखील मिळाली असेल मात्र याच कवितेला समोर ठेऊन पुण्यातील सिंहगडावर लिंबू सरबताचा स्टॉल चालवणाऱ्या लहू उघडे याने जगातील सर्वोच्च एव्हरेस्ट शिखर केलं आहे. लहानपणापासून सिंहगडाशी आणि निसर्गाशी असलेला लळा त्याला थेट एव्हरेस्ट शिखरावर घेऊन गेला आहे.


लहू उघडे याची सोनाबाई यांचं सिंहगडाच्या पायवाटेला हॉटेल आहे. शनिवार-रविवारी सिंहगड पायथा आतकरवाडीतून अनेकजण व्यायामासाठी गडावर येतात. त्यांच्यासाठी तो लिंबू- सरबतपासून पिठलं-भाकरी तो विकायचा. जन्मापासून वडिलांचे छत्र नाही. आईला मदत करताना शिक्षण घेताना त्याची जगण्याची धडपड सुरु होती. एवढं असूनही गडावर सरबत विकत खानापूरच्या शाळेत शिक्षण घेतले. दहावीनंतर आयटीआय केलं. नोकरी न मिळाल्याने पाण्याचे जार वाहतूक करणाऱ्या गाडीवर हमाल म्हणून काम केले.


'निसर्गाच्या सानिध्यात बालपण गेलं'


लहू उघडे याला लहानपणापासून निसर्ग खुणावत आहे. सह्याद्रीच्या पर्वतरांगा आणि निसर्गरम्य वातावरणात त्याचं लहानपण गेलं. त्यामुळे त्याला गिर्यारोहणाची आवड निर्माण झाली. त्यामुळे त्याने आतापर्यंत 800 फुटी कोकणकडा रॅपलिंग, लिंगाणा, देवकुंड रॅपिल्लिंग, जीवधन वानरलिंगी व्हॅली क्रॉसिंग, वजीर, तैल- बैल, भैरवगड सर केले आहेत. 


'पैशाची जुळवाजुळव करण्यात वर्ष वाया गेलं पण तो हरला नाही'


सह्याद्रीच्या कुशीतील अनेक गड सर केल्यानंतर एव्हरेस्ट शिखर सर करण्याचं त्याचं स्वप्न होतं. मात्र घरातील अर्थिक परिस्थिती हलाखीची होती. त्यामुळे पैशांची जुळवाजुळव करणं हे त्याच्यासाठी मोठं आव्हान होतं. त्यानंतर त्याने अनेकांकडे मदत मागितली. नेपाळ सरकारचे शुल्क आणि इतर खर्च धरून एव्हरेस्ट मोहिमेसाठी साधारण 30 ते 32 लाख रुपये खर्च येतो. मात्र पैशांची जुळवाजुळव होत नसल्याने त्याचं एक वर्ष वाया गेलं. त्यानंतर पुनित बालन यांनी त्याला आर्थिक मदत केली आणि त्याने त्याचं स्वप्न पूर्ण केलं. 



राष्ट्रीय पातळीवरील यशस्वी चढाई केलेले पर्वत


भागीरथी 2 - 6.512 मीटर


माऊंट युनाम- 6,111 मीटर


फ्रेंडशिप पीक -5,298 मीटर


सह्याद्रीतील सुळक्यांवर यशस्वी चढाई


खडापारशी - 450 फुट


वजीर - 200 फुट


ड्युक्स नोज - 250 फुट


लिंगाणा - 800 फुट


तैलबैल - 180 फुट


बाण- 750 फुट

संबंधित बातमी-