SSC & HSC Board Exam Time Table 2025 : पुणे : निवडणुकांच्या धामधुमीत राज्यातील 10 वी आणि 12 बोर्ड परीक्षेचं (HSC Shedule) वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाकडून बोर्ड परीक्षांचे वेळापत्रक जारी करण्यात आलं असून 21 फेब्रुवारी रोजी दहावीची परीक्षा होणार आहे. बारावी आणि दहावीच्या परीक्षेचे अंतिम वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. त्यानुसार बारावीची लेखी परीक्षा 11 फेब्रुवारी ते 18 मार्च या कालावधीत, तर दहावीची लेखी परीक्षा (SSC) 21 फेब्रुवारी ते 17 मार्च या कालावधीत घेतली जाणार असून, दरवर्षीच्या तुलनेत यंदा सुमारे आठ ते दहा दिवस परीक्षा लवकर होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. राज्य मंडळाचे सचिव देविदास कुल्हाळ यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे अंतिम वेळापत्रकाबाबतची माहिती दिली.


महाराष्ट्र बोर्डाची परीक्षा दोन शिफ्टमध्ये घेण्यात येत असून पहिली शिफ्ट सकाळी 11:00 ते दुपारी 2:00 आणि दुसरी शिफ्ट दुपारी 3:00 ते संध्याकाळी 6:00 पर्यंत असणार आहे. दहावीची परीक्षा पहिल्या दिवशी मराठी भाषेच्या पेपरने सुरू होईल आणि बारावीच्या परीक्षेचा पहिला पेपर इंग्रजीचा असेल. महाराष्ट्र बोर्डाच्या अधिकृत वेबसाइट mahahsscboard.in वर जाऊन विद्यार्थी वेळापत्रक डाउनलोड करू शकतात. तसेच, दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षांचे प्रवेशपत्र जानेवारी 2025 मध्ये जारी करण्यात येणार असून महाराष्ट्र मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर हॉल तिकीट प्रसिद्ध केले जाईल. त्यामुळे, विद्यार्थ्यांना आता परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी अडीच ते 3 महिन्यांचाच कालावधी मिळणार आहे.  


दरम्यान, एकीकडे विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू असल्याने सर्वचजण निवडणूक प्रचारात आणि मतदान प्रक्रियेत दंग होते. शाळेतील शिक्षकांनाही निवडणूक मतदानाची जबाबदारी देण्यात आली होती. मात्र, मतदान प्रक्रिया पार पडताच बोर्डाने 10 वी आणि 12 वी परीक्षेचं वेळापत्रक जारी केलं आहे. 


CBSC परीक्षेचंही वेळापत्रक जाहीर


CBSE Exam Datesheet 2025: कोणत्या विषयाच्या परीक्षेनं सुरुवात


दहावीच्या परीक्षेची सुरुवात इंग्रजी विषयाच्या परीक्षेनं होईल.तर, शेवटचा पेपर माहिती तंत्रज्ञान विषयाचा असेल, या विषयाची परीक्षा 18 मार्चला संपन्न होईल. तर, बारावीच्या परीक्षेची सुरुवात शारीरिक शिक्षण विषयानं होईल. तर 4 एप्रिलला मानसशास्त्र विषयाचा पेपर असेल. 


CBSE Exam Datesheet 2025: प्रत्येक विषयात किती गुण मिळावावे लागणार?


सीबीएसई बोर्डाच्या परीक्षेत यशस्वी व्हायचं असल्यास विद्यार्थ्याला प्रत्येक विषयात किमान 33 टक्के गुण मिळवावे लागतील. दहावीचे पेपर  10:30 ते  01:30 दरम्यान आयोजित केले जातील. बारावीच्या परीक्षेची वेळ देखील हिच असेल.


हेही वाचा


मी 25 ते 30 मतदारसंघात फोन केले, फडणवीसांनी सांगितलं; वाढलेली टक्केवारी अन् लाडकी बहीणचा फायदा कोणाला