बारामती, पुणे : शिवसेना शिंदे गटाचे माजी आमदार विजय शिवतारे (Vijay Shivtare) यांनी बारामती लोकसभा निवडणूक लढवणारच असा निर्धार केला आहे. त्यांनी शरद पवार आणि अजित पवारांविरोधात बारामतीत शड्डू ठोकला आहे. बारामती लोकसभा मतदार संघातून अपक्ष निवडणूक लढवणार असल्याचं शिवतारेंनी जाहीर केलं आहे. त्यानंतर त्यांनी अजित पवारांवर चांगलाच हल्लाबोल केला. अजित पवारांमधला उर्मटपणा गेला नाही, जनतेलाही ते आवडत नाहीत. त्यामुळे शप्पत घेऊन सांगतो बारामतीतून अजित पवार जिंकू शकत नाही, आमची लढाई सुप्रिया सुळेंबरोबर आहे, अशा शब्दांत त्यांनी अजित पवारांवर हल्लाबोल केला आहे. आज शिवतारे यांनी सासवडमध्ये कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्या बैठकीनंतर ते बोलत होते.
विजय शिवतारे काय म्हणाले?
शिवतारेंनी अजित पवारांवर चांगलाच हल्लाबोत केला आणि गावातील लोक काय म्हणतात हे सांगितलं, ते म्हणाले की, मी अनेक गावागावत फिरतो. त्या गावात सामान्य जनतेच्या प्रतिक्रिया अजित पवारांच्या विरोधातल्या आहेत. सगळ्या प्रतिक्रियावरुन मी सांगतो की अजित पवार काहीही करु देत ते जिंकू शकणार नाहीत. आमची लढाई अजित पवारांविरोधात नाही तर आमची लढाई ही सुप्रिया सुळेंविरोधात आहे. अजित पवार न जिंकण्याचं कारण म्हणजे त्यांच्यात असलेला उर्मटपणा आहे. त्याच्याविरोधात सामान्य जनता आहे. देवाची शप्पत घेऊन सांगतो अजित पवारांविरोधात लोक प्रतिक्रिया देत आहेत, असं ते म्हणाले.
मी साधारण कार्यकर्ता नाही, मी मंत्री आहे!
'नमो रोजगार मेळाव्याच्या दिवशी मी अजित पवारांना फुलांचा गुच्छ घेऊन गेलो. माझा प्रोटोकॉल होता म्हणून गेलो होतो. मात्र त्यांनी माझ्याकडे लक्षही दिलं नाही. मी काही साधारण कार्यकर्ता नाही तर मी मंत्री आहे. ते असतील पन्नास हजार कोंटीचे पण मी अब्जोंबमध्ये काम करणारा माणूस आहे ते पण स्वत:च्या कर्तृत्वावर. स्वागत करायला गेलो असता त्यांनी लक्ष दिलं नाही त्यावेळी माझा जिल्हाप्रमुख म्हणाला की बापू याला धडा शिकवला पाहिजे. या अजित पवारांचा माज गेलेला दिसत नाही', असा हल्लाबोल त्यांनी अजित पवारांवर केला आहे.
लोक म्हणाले, अजित पवारांना मतदान करणार नाही!
"त्यांना मी माफ केले होते, महायुती झाल्यानंतर. पण त्यांची गुर्मी तशीच होती. त्यांचा उर्मटपणा कायम होता. म्हणून आम्ही अजित पवारांना मतदान करणार नाहीत असे लोकांनी सांगितले. पवारांच्या विरोधातली मते आहेत. लोकांचा घात होतोय असं कळले.", असं शिवतारे म्हणाले.
पाहा व्हिडीओ : Vijay Shivtare on Ajit Pawar : "अजित पवारांमधला उर्मटपणा गेला नाही, जनतेलाही ते आवडत नाहीत"