Sachin Ahir : विजय शिवतारे (vijay shivtare) यांचे नामकरण 'पलटूराम' असं झालं असल्याची टीका शिवसेना नेते सचिन अहिर (Sachin Ahir) यांनी केली. लोक आता निष्ठावंत राहिले नसल्याचे अहिर म्हणाले. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अहिर बारामती लोकसभा (Baramati Loksabha) मतदारसंघाच्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी शिवतारेंवर टीका केली. दरम्यान, लोकसभेची निवडणूक विरोधकांना सोपी नसल्याचे अहिर म्हणाले. 


खडसे यांच्याबद्दल खर की खोटं माहीत नाही


एकनाथ खडसे हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत. याबाबत सचिन अहिर यांना विचारले असता, अहिर म्हणाले की, खडसे यांच्याबद्दल खर की खोटं माहीत नाही. पण विरोधी पक्षातील नेते फोडण्याची वेळ सत्ताधाऱ्यांवर का आलीय? असा सवाल अहिरांनी केला. गिरीश महाजन आणि खडसे यांच्यातील वैर सभागृहात पाहिलं आहे असं ते म्हणाले. सत्तेसाठी एकत्र येणं ही दुर्देवी बाब असल्याचं खडसे म्हणाले. 


दुसऱ्या पक्षातील नेते उमेदवारी जाहीर करत आहेत, श्रीकांत शिंदेंना टोला


कल्याण लोकसभा मतदारसंघातून श्रीकांते शिंदे यांच्या उमेदवारीची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. यावर बोलताना अहिर म्हणाले की, आता नवीनच पद्धत अस्तित्वात येत आहे. दुसऱ्या पक्षातील नेते उमेदवारी जाहीर करत आहेत. यामुळं विधानसभा निवडणुकीत विरोधकांची परिस्थिती आणखीनच अवघड होईल असं अहिर म्हणाले. 


विश्वजित कदम पक्षश्रेष्ठींचे आदेश मानतील 


सांगलीच्या जागेबाबत निर्णय झाला आहे. आपल्या पक्षाकडे उमेदवारी मागण्याचा अधिकार असल्याचे अहिर म्हणाले. सांगलीच्या जागेबाबत विश्वजित कदम पक्षश्रेष्ठींचे आदेश मानतील असं अहिर म्हणाले. सवकरच सांगलीच्या जागेबाबतचा तोडगा निघेल असं अहिर म्हणाले. 
सध्या भाजपा कोणत्या दिशेला परिस्थिती घेऊन चाललं आहे. भाजपाला रोखण्यासाठी आमचे प्रयत्न सुरु असल्याचे अहिर म्हणाले. पवार साहेबांनी सांगितलं आहे की, बारामतीकडे संपूर्ण देशाचं लक्ष आहे असं अहिर म्हणाले. 


महत्वाच्या बातम्या: