Amol Kolhe पुणे : शिरूर लोकसभा मतदारसंघात (Shirur Lok Sabha Constituency) डॉ. अमोल कोल्हे विरुद्ध शिवाजीराव आढळराव पाटील (Amol Kolhe vs Shivajirao Adhalrao Patil) अशी लढत होणार आहे. या पार्श्वभूमीवर डॉ. अमोल कोल्हे आणि शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या आरोपांच्या फैरी सुरु आहे. आता अमोल कोल्हे यांनी पुन्हा एकदा आढळराव पाटलांवर निशाणा साधला आहे. पहिल्याच टर्म मध्ये तीनवेळा संसदरत्न मिळाला म्हणून आढळराव पाटील यांच्या पोटात दुखत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. 


हडपसर येथे डॉ. अमोल कोल्हे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की,  महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) सर्व नेते पाठीशी आहेत. भाजप आणि महायुती विरुद्ध जनता निवडणुकीत उतरली आहे. आढळराव पाटील यांनी 15 वर्षांत किती निधी आणला हे त्यांनी जाहीर करावं मी मतदारसंघात 19 हजार 500 कोटी रुपये निधी आणू शकलो त्याचा मला आनंद, असल्याचे त्यांनी म्हटले आहे. आढळराव पाटील यांनी मतदारसंघात गेल्या १५ वर्षांत एक मोठा प्रकल्प आणलेला दाखवावा हे माझं त्यांना खुलं आव्हान असल्याचेही अमोल कोल्हे म्हणाले. 


...म्हणून आढळराव पाटलांच्या पोटात दुखतंय


आढळराव पाटील यांनी फक्त एकच उत्तर द्यावं, लोकांनी 15 वर्षे निवडून दिलं. त्यांना का बैलगाडा शर्यत सुरु करता आली नाही ही बैलगाडा शर्यत का 7 वर्षे बंद होती? मी एवढे वर्षे अभिनय क्षेत्रात काम करतो परंतु इतक्या पटकन कधीही भूमिका बदलण्याचं माझ्या पाहण्यात नाही. आढळराव पाटील यांनी इतक्या पटकन भूमिका बदलली याला मी सलाम करतो. नावडतीचे मीठ आळणी असे म्हणत पहिल्याच टर्ममध्ये तीन वेळा संसदरत्न मिळाला म्हणून आढळराव पाटील यांच्या पोटात दुखतं आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या मुलाला देखील 10 बाय 10 च्या खोलीत संसदरत्न पुरस्कार मिळाला असेल तर हीच भूमिका तुमची असेल का? असा सवाल त्यांनी आढळराव पाटील केला आहे. 


अमोल कोल्हेंचा अजित पवारांना टोला 


तुतारीला मत म्हणजे शरद पवारांना (Sharad Pawar) मत. महायुती (Mahayuti Seat Sharing) महाराष्ट्रात टिकेल की नाही यावर शंका आहे, घड्याळाला फक्त 4 ते 5 जागा वाट्याला याव्या आणि त्यातही एक घरात 2 आयात, एक प्रदेशाध्यक्ष असे उमेदवार द्यावे लागतात. त्यातही दिल्लीवारी करूनही केवळ 4 ते 5 जागांवर समाधान मानावं लागतं. चॅलेंज देणारे नेते मोठे आहेत, यापूर्वी त्यांच्यामागे शरद पवार होते. ते मोठे नेते आहेत. आम्ही सर्वसामान्य आहोत, आम्हाला लढायचं कळतं, असा टोला त्यांनी यावेळी अजित पवारांना (Ajit Pawar) लगावला आहे. 


खडसेंना भाजपमध्ये कशी वागणूक मिळाली हे त्यांना माहितीय


एकनाथ खडसे (Eknath Khadse) हे शरद पवार गटाला रामराम ठोकत भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार आहेत. स्वतः एकनाथ खडसे यांनीच याबाबत माहिती दिली आहे. याबाबत डॉ. अमोल कोल्हे यांना विचारले असता ते म्हणाले की, एकनाथ खडसे दिग्गज नेते आहेत. त्यांना भाजपमध्ये (BJP) काय पद्धतीने वागणूक मिळाली हे त्यांना माहीत आहे.  त्यामुळे त्यावर मी भाष्य करणं योग्य नाही, असे त्यांनी म्हटले आहे. मंगलदास बांदल यांची उमेदवारी मागे घेण्याबाबत वंचितचा हा अंतर्गत निर्णय आहे. माझं अजून कोणाशी बोलणं झालं नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. 


आणखी वाचा 


Girish Mahajan on Eknath Khadse : एकनाथ खडसेंची भाजपची वाट खडतर? गिरीश महाजनांचा मोठा गौप्यस्फोट, उन्मेष पाटलांचाही घेतला खरपूस समाचार!