मंचर (जि. पुणे) : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी (Loksabha Election 2024) शिरुरच्या (Shirur) उमेदवारीवरून चर्चा रंगली असतानाच आता शिंदे गटाचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील (Shivajirao Adhalarao Patil) यांचा अजित पवार (Ajit Pawar) गटात प्रवेश निश्चित झाल्याचीच चर्चा आहे. शिंदे गटाचे नेते शिवाजी आढळराव पाटील उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वागतासाठी आज मंचरमध्ये उपस्थित राहिले. शिवाजी आढळराव पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं स्वागत करत त्यांच्यासोबत एकाच गाडीत प्रवास केल्याने राजकीय भूवया उंचावल्या आहेत. 


शिरूर लोकसभेची उमेदवारी जवळपास निश्चित


अजित पवार मंचरमध्ये विविध विकासकामांच्या उद्घाटनासाठी आणि शरद पवारांच्या सभेनंतर उत्तर सभेसाठी आले असताना त्यांच्या स्वागतासाठी आढळराव पाटील उपस्थित होते. त्यामुळे आढळराव पाटील यांची शिरूर लोकसभेची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जात आहे. आढळराव पाटील अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात कधी प्रवेश करणार याची सध्या मतदारसंघात चर्चा रंगली आहे. मात्र, उमेदवारी नक्की कधी जाहीर होते आणि पक्षप्रवेश कधी होतो हे ही पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे. 


अजित पवारांचा अमोल कोल्हेंवर हल्लाबोल 


दुसरीकडे, शिरुर लोकसभेसाठी माणसातला माणूस उभा करणार आहे. तुम्ही एकदिलाने काम करा आणि त्या उमेदवाराला निवडून द्या, असे आवाहन अजित पवार यांनी केलं आहे. ते म्हणाले की, राजेश खन्ना, शत्रुघ्न सिन्हा, हेमा मालिनी, गोविंदा, अगदी अमिताभ बच्चनही निवडून आले अन मग राजीनामा दिला, पण त्यांना मतदारांचे काही पडलेलं नसतं. आपण राजबिंडा पाहून निवडून देतो. त्यात आमची चूक आहेच. मध्ये शिवनेरीवर मला खासदार (अमोल कोल्हे) भेटले. मी म्हटलं का ओ डॉक्टर आधी राजीनामा द्यायचं म्हणत होते, आता परत दंड थोपटले. हो, दादा आता परत लढायची इच्छा झाली. आम्हाला उमेदवार मिळाला नाही की आम्ही कलाकार पुढं आणतो, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अमोल कोल्हे यांची खिल्ली उडवली. 


इतर महत्वाच्या बातम्या