पुणे : पुणे शहरात अनियमित, अपुरा होणारा पाणीपुरवठा आणि शहरातील डुक्करांची वाढती संख्या याविरोधात शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी मोर्चा काढला. शिवसेनेकडून महापालिकेवर आज डुक्कर आणि हंडा मोर्चा काढण्यात आलाय.

आयुक्तांकडे वारंवार या समस्यांचं गाऱ्हाणं मांडल्यानंतरही काहीच फरक पडला नसल्यानं आज अखेर हे आंदोलन करण्यात आलं. प्रभाग क्रमांक 26 हडपसर मध्ये अनियमित पाणीपुरवठा होत आहे. या प्रभागात डुक्करांची संख्या जास्त आहे. या विरोधात हा मोर्चा काढण्यात आला.

Shivsena Protest | शिवसेनेचा महापालिकेवर डुक्कर आणि हंडा मोर्चा | पुणे | ABP Majha



या मोर्चाचे नेतत्व हे शिवसेनेचे नगरसेवक नाना बानगिरे यांनी केलं. आयुक्तांना त्यांनी वारंवार प्रस्ताव देऊन प्रभागातील समस्या सांगितल्या होत्या. मात्र त्यावर कोणतीच उपाययोजना होत नसल्याने अखेर त्यांनी सेना स्टाईलने आंदोलन करत आयुक्तांच्या दारात डुक्कर सोडण्याचा प्रयत्न केला.