Sharad Mohol Case :  गुंड शरद मोहोळ खून प्रकरणात दररोज नवनवे खुलासे होत आहेत.  प्रमुख आरोपी गुंड गणेश मारणे याला  (Sharad Mohol Case) पुणे पोलिसांनी पाठलाग करत अटक केले होते. आज या प्रकरणात नवीन माहिती समोर आली आहे. गुंड शरद मोहोळ याची पत्नी स्वाती हिने पोलिस जबाबात गणेश मारणे  (Ganesh Marne)  याच्यापासून जिवाला धोका असल्याचा दावा केला आहे. गुरुवारी पोलिसांनी गणेश मारणे याला न्यायालयात हजर केले. कोर्टाने त्याला नऊ फेब्रुवारीपर्यंत कोठडी सुनावण्यात आली आहे.


9 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी - 


गुंड शरद मोहोळची पत्नी स्वाती मोहोळ आणि फिर्यादी अरुण धृपद धुमाळ यांनी गणेश मारणे आणि विठ्ठल शेलार यांच्यापासून जिवाला धोका असल्याचं पुरवणी जबाबात सांगितलं आहे. तपास अधिकारी सहायक पोलिस आयुक्त सुनील तांबे यांनी गुरुवारी न्यायालयात याबाबतची माहिती दिली. पुणे पोलिसांनी गुरुवारी न्यायालयात गोपनीय अहवाल सादर केला.  गणेश मारणे याला पोलिसांनी पाठलाग करत नाशिक रोडवरुन बुधवारी पात्री बेड्या ठोकल्या. शरद मोहोळ खून प्रकरणात गणेश मारणेसह 15 आरोपींवर मोक्काअंतर्गत कारवाई  (Pune Police MCOCA Action) केली. त्यामुळे गुरुवारी मोक्का न्यायाधीश व्ही आर कचरे यांच्यापुढे सुनावणी झाली. तपास अधिकारी सुनील तांबे यांनी यावेळी सांगितले की, आतापर्यंत 15 आरोपींना अठक करण्यात आली आहे. विठ्ठल शेलार आणि गणेशम मारणे हे दोघे या खूनप्रकरणातील प्रमुख सूत्रधार आहेत. 5 जानेवारी रोजी शरद मोहोळ याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. त्याकाळात गणेश ममारणे तीन राज्यात फिरल्याचे तपासात उघड झालेय.  न्यायालयाने गणेश मारणे याला 9 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.    


2008 नंतर गणेश मारणेवर एकही गुन्हा नाही - 


शरद मोहोळ खून प्रकरणात गणेश मारणे याचं नाव आहे. यापूर्वी त्याच्यावर आठ गंभीर गुन्ह्याची नोंद आहे. त्यामुळे आरोपी गणेश मारणेला जास्तीत जास्त पोलीस कोठडी देण्याची मागणी सरकारी वकील प्रमोद बोंबटकर यांनी केला. याला गणेश मारणे याचे वकील राहुल देशमुख यांनी विरोध केला. आरोपी गणेश मारणे याच्यावर 2008 नंतर एकाही गुन्हा नोंदवला नाही. पोलिसांकडून आम्ही गणेश णारणेची पोरं आहोत, असे आरोपीने सीसीटीव्हीमध्ये म्हटल्याचे दिसतेय. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. पण आरोपी साधे पुटपुटतही नसल्याचे दिसतेय. आरोपीला या कटात गोवण्यात आलेय. दोन दिवसांची पोली ठोकडी ठीक आहे, असा युक्तीवाद देशमुख यांनी केला. 


आणखी वाचा :


3 राज्यात गुंगारा दिला, संगमनेरजवळ पोलिसांनी पाठलाग करुन ठोकल्या बेड्या, गुंड गणेश मारणे कसा पकडला?