पुणे : पुण्यातील ससून रुग्णालयातून ड्रॅग्स रॅकेट चालवणारा (Pune Crime News)  ड्रॅग्स माफिया ललित पाटील पोलिसांच्या तावडीतून पळून गेल्यानं प्रचंड खळबळ उडाली होती. पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्न चिन्ह निर्माण करण्यात आलं होतं.  या प्रकरणात हलगर्जीपणा केल्यामुळे पुण्यातील 9 पोलिसांना निलंबित करण्यात आलं आहे. या प्रकरणी पीएसआय जनार्दन काळे, पोलीस हवालदार  विशाल ठोपले, स्वप्नील शिंदे,दिगंबर चंदनशिव, पीएसआय मोहिनी डोंगरे, हवालदार आदेश शिवणकर, नाईक, नाथाराम काळे,शिपाई पिरप्पा बनसोडे शिपाई आमित जाधव अशी निलंबित केलेल्या पोलिसांची नावं आहेत. 


नेमकं काय आहे प्रकरण ?


ससून रुग्णालयातील (Sassoon Hospital) ड्रग्ज रॅकेटचा म्होरक्या ललित पाटील पोलिसांच्या ताब्यातून पळाला होता. त्यानंतर संपूर्ण पोलीस प्रशासन, ससूनचं आरोग्य विभाग आणि कारागृहातील सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलं होतं. या सगळ्यांची सुरक्षा असताना जर आरोपी पळून जात असेल तर या आरोपीला कोणीतरी आश्रय देत आहे, असा संशय व्यक्त केला जात होता. 


रविवारी ससून रुग्णालयाच्या गेटसमोर 2 कोटींचा अमली पदार्थ जप्त करण्यात आला होता. या प्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यातील दोघांना अटक केली होती आणि ललित पाटील हा ससून रुग्णालयात उपचार घेत असल्याने त्याला नोटीस देण्यात आली होती. मात्र त्यापूर्वीच त्याने एक्स रे काढण्य़ाच्या बाहण्याने पोलिसांनी एक्स रे वॉर्डमध्ये घेऊन जाण्यास सांगितलं आणि तिथेच पोलिसांच्या हातावर तुरी देत पळ काढला. 


आजारपणाचा बनाव केला अन्...


ललित पाटील हा उपचार घेत होता. काही दिवसांपूर्वी पुणे जिल्ह्यातील चाकण भागात अमली पदार्थांची तस्करी करताना  बेड्या ठोकण्यात आल्या होत्या. त्यानंतर त्याची रवानगी येरव़डामध्ये करण्यात आली होती करण्यात आली. मात्र येरवडा कारागृहातील कर्मचाऱ्यांच्या संगनमताने त्याने त्याला पोटाचा विकार झाल्याचा बनाव रचला आणि तीन महिन्यांपूर्वी तो ससून रुग्णालयात उपचारांसाठी दाखल झाला. कैद्यांसाठी असलेल्या वॉर्ड नंबर 16 मधे त्याला ठेवण्यात आलं. या 16 नंबर वॉर्ड बाहेर पोलिसांचा पहारा असतो. मात्र ससून रुग्णालयातील कर्मचारी रौफ शेख आणि येरवडा कारागृहात ओळख झालेला सुभाष मंडल यांना हाताशी धरुन ललित पाटीलने ससून रुग्णालयातील कैद्यांच्या वॉर्डमधून ड्रग्ज रॅकेट चालवायला सुरुवात केली होती.


हेही वाचा-


Sasoon Hospital Drug Racket Pune : ललित पाटील ससूनमधून ड्रॅग्स रॅकेट कसं चालवत होता आणि पळून जाण्यात कसा यशस्वी झाला ?