Lonawala Double Murder Case: लोणावळ्यात महाविद्यालयीन तरुण सार्थक वाघचौरे आणि श्रुती डुंबरे या तरुणीचा मृतदेह हात बांधलेल्या अवस्थेत आढळून आले होते. मृत तरुण आणि तरुणी लोणावळ्यातील सिंहगड महाविद्यालयात अभियांत्रिकीचे विद्यार्थी होते. तरुण अहमदनगरच्या राहुरीचा, तर तरुणी मूळची पुण्याच्या ओतूरची होती. लोणावळ्यातल्या (Lonawala Double Murder Case) आयएनएस शिवाजी समोर आणि भुशी धरणाच्या टेकडीवर या दोघांचे मृतदेह सापडले होते. हात बांधून तीक्ष्ण वस्तूवर डोकं आपटल्याने त्यांचा मृत्यू झाला होता. दोघांच्या शरीरावर अनेक ठिकाणी जखमांच्या खुणाही आढळल्या आहेत. दोन्ही मृतदेहांचे हात-पाय बांधण्यात आले होते. तर अंगावर आणि डोक्यावर जबर जखमा आढळल्या आहेत. या दुहेरी हत्याकांडाचा आज निकास समोर आला आहे. 


लोणावळा दुहेरी हत्याकांड (Lonawala Double Murder Case) प्रकरणातील आरोपी सलीम शब्बीर शेखची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. या घटनेबाबतचा पुरावा नसल्याने आरोपी सलीम शब्बीर शेखची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. तर दुसरा आरोपी अल्पवयीन होता. सात वर्षानंतर दुहेरी हत्याकांडाचा निकाल समोर आला आहे. चोरीच्या उद्देशाने लोणावळ्यात 2017 मध्ये सार्थक वाघचौरे आणि श्रुती डुंबरे यांची हत्या करण्यात आली होती.


श्रृती आणि सार्थक यांचे मृतदेह भुशी धरणावरील डोंगरामध्ये 3 एप्रिल 2017 विवस्त्र अवस्थेत सापडले होते. या प्रकरणात पाचशेहून अधिक नागरिकांची लोणावळा (Lonawala Double Murder Case) पोलिसांनी चौकशी केली होती. दुहेरी हत्याकांडानंतर काही दिवसांनी ज्या दुचाकीवरुन श्रुती आणि सार्थक त्या ठिकाणी गेले होते ती दुचाकी पोलिसांच्या हाती लागली. त्यानंतर या प्रकरणाचा सखोल तपास सुरू झाला. 


या प्रकरणातील आरोपीची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. लोणावळा हत्या प्रकरणातील आरोपी सलीम शब्बीर शेखची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. पुरावा नसल्याने निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. या प्रकरणातील दुसरा आरोपी अल्पवयीन होता. तब्बल सात वर्षानंतर दुहेरी हत्याकांडाचा निकाल समोर आला आहे. चोरीच्या उद्देशाने लोणावळ्यात (Lonawala Double Murder Case) 2017 मध्ये या जोडप्याची हत्या करण्यात आली होती.