Pravin Darekar : संजय राऊत यांना अजिबात सिरीयस घेण्याची गरज नाही. ते उठल्यानंतर किंवा रात्री झोपतानाच कोणता आरोप करायचा, असा विचार करत असतात. आमच्या नजरेत त्यांच्या आरोपाला शून्य किंमत असल्याची खोचक प्रतिक्रिया भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी दिली. ते आज पुण्यामध्ये आले असता त्यांनी बोलताना संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केली. 


संजय राऊत यांचा घोडा बेफाम सुटला 


आजच्या 'सामना'मधून माजी केंद्रीय मंत्री खासदार नारायण राणे यांच्यावर टीका करण्यात आली आहे. त्या टीकेवरून दरेकर यांनी संजय राऊत यांच्यावर जोरदार तोफ डागली. प्रवीण दरेकर म्हणाले की संजय राऊत यांचा घोडा बेफाम सुटला आहे. त्यांना वेसण घालण्याची गरज आहे. शिवसेनेचा कोकणमधून बेस हलला आहे. भिवंडी सोडून 100 टक्के महायुतील यश मिळालं असल्याचा दावा प्रवीण दरेकर यांनी दावा केला. त्यामुळे वैफल्यातून संजय राऊत वक्तव्य करत असल्याचे दरेकर यांनी म्हटलं आहे. आमच्या पक्षांमध्ये कोणाला मंत्री करावं आणि कोणाला करू नये, याची चिंता संजय राऊत यांनी करू नये. सुनील राऊत तयार होते, त्यांचे आधी उत्तर द्या मग आम्ही उत्तर देऊ, अशी प्रतिक्रिया प्रवीण दरेकर यांनी दिली. 


तिघांच्या समन्वयातून मंत्रिमंडळ विस्ताराचा निर्णय घेतला जाईल


दरम्यान, मराठा ओबीसी वादावर दरेकर यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की सरकार सकारात्मक भूमिकेतून विचार करत आहे. त्यामुळे कोणावरही अन्याय होणार नसल्याचे त्यांनी सांगितलं. मंत्रिमंडळ विस्तारावर त्यांनी भाष्य केले. ते म्हणाले की उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजितदादा या तिघांच्या समन्वयातून मंत्रिमंडळ विस्ताराचा निर्णय घेतला जाईल. 


महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचा फॉर्म्युलावर प्रवीण दरेकर यांनी भाष्य केले. तिन्ही पक्षांमध्ये चढाओढ दिसत आहे. निवडणूक होईपर्यंत काय होते ते बघा असे ते म्हणाले. प्रत्येकाला मुख्यमंत्रीपदाचे डोहाळे लागले आहेत, भ्रमात आहेत. एकमेकांचे पाय खेचले जातील अशी टीकाही त्यांनी केली. दरम्यान, मुलींच्या मोफत शिक्षणाची चंद्रकांत पाटील यांनी घोषणा करूनही अंमलबजावणी होत नसल्याने प्रवीण दरेकर यांना विचारण्यात आलं असता 100 टक्के या निर्णयाची अंमलबजावणी होईल, अधिवेशनामध्ये नक्की विषय मांडणार असल्याचे त्यांनी सांगितले. 


इतर महत्वाच्या बातम्या