पुणे : विधानसभा निवडणुकांच्या घोषणेपूर्वीच राज्यातील राज्यातील राज्यपाल नियुक्त आमदारांची निवड करण्यात आली. विशेष म्हणजे या 7 आमदारांचा शपथविधीही पार पडला. त्यामध्ये, महायुतीमधील भापज पक्षाला तीन, शिवसेनेला 2 आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील 2 जणांना संधी देण्यात आली आहे. मात्र, या निवडीनंतर पक्षांतर्गत नाराजीनाट्य सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीतून पंकज भुजबळ आणि इद्रीस नायकवाडी यांना आमदारकीची संधी मिळाली आहे. दुसरीकडे रुपाली चाकणकर (Rupali chakankar) यांनाही पुन्हा एकदा राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी संधी देण्यात आली आहे. त्यामुळे, पुण्यातील (Pune) राष्ट्रवादीचे काही नेते नाराज झाले आहेत. पुण्यातील राष्ट्रवादीचे शहराध्य़क्ष दीपक मानकर यांनी आपल्या सहकाऱ्यांसह राजीनामा देण्याची तयारी दर्शवली. तर, आता रुपाली ठोंबरे यांनीही रुपाली चाकणकर यांच्या निवडीवर भाष्य करताना टोला लगावला आहे. 


मला राज्यपाल नियुक्त आमदार केलं नाही हे मी समजू शकते, संघटना मजबूत झाली पाहिजे त्यासाठी एक पक्ष एक पद हे गणित पाहिजे असं मी दादांना देखील सांगितलं आहे. काही ठिकाणी समजूतदारपणा घ्यावा लागतो, प्रत्येकजण आपल्या राजकीय फायद्यासाठी निर्णय घेत असतो. आम्ही तक्रार दादांना सांगू शकतो, मला सांगितलं तुम्ही तुमचं काम करा. क व्यक्ती एक पद यासंदर्भात देखील निर्णय येत्या काळात घेऊ असं दादांनी म्हटलं आहे. 


पक्षात मी नाराज नव्हते, मला राष्ट्रवादी काँग्रेसने स्वीकारलं आहे, पण रुपाली चाकणकर मला बाहेरची म्हणत असेल तर बाहेरुन लढते ना, त्यांचं हे बोलणं चुकीचं आहे, अशा शब्दात रुपाली ठोंबरे यांनी रुपाली चाकणकर यांच्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. चाकणकर यांचं मी पहिले अभिनंदन केलंय, मी संघटनेच्याबाबत बोलत होते, एक पद-एक व्यक्ती न्याय द्यावा, त्यात रुपाली ठोंबरे पाटीलच नव्हे तर इतर महिलांना देखील पदं दिली पाहिजे. मी लोकांमधून निवडून येणारी व्यक्ती, त्यांनी स्वत:वर ओढवून घेऊ नये. त्यांना माझी अडचण काय आहे? की आम्ही सर्व महिला एकत्र येत आहे ही अडचण आहे,अस म्हणत ठोंबरेंनी रुपाली चाकणकर यांना टोला लगावला आहे. मी कसबा विधानसभा मतदारसंघातून तिकीट मागितले होतं, मात्र 2019 साली तिकीट कापलंच होतं ना,  मला त्या पक्षात नवीन आलेल्या म्हणाल्यात, मी मागच्या 19 वर्षांपासून राजकारणात काम करते आहे. आमच्यात वाद नव्हता, त्यांनी गैरसमज करुन घेतलेला आहे, असेही रुपाली ठोंबरे यांनी म्हटलं.  दरम्यान, दीपक मानकर यांच्याशी देखील माझी चर्चा झाली आहे, त्यांनी तोडगा काढला आहे, त्यांचीही नाराजी दूर होईल, असेही रुपाली ठोंबरे यांनी म्हटलं.  


हेही वाचा


अजित पवारांच्या त्रासाला कंटाळून भाजप सोडतोय; माजी मंत्र्यांची घोषणा, तुतारी हाती घेणार