पुणे : कोणत्याही प्रार्थनास्थळांच्या खाली हिंदू मंदिरे असल्याचा उठसूट दावा करणं अस्वीकारार्ह असल्याचं राष्ट्रीय सव्यंसेवक संघाचे सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांनी म्हटलंय. वेगवेगळ्या धर्मीयांना तसंच विचारधारांना सलोख्याने भारतात राहण्यासाठी योग्य वातावरण तयार व्हावं अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

भारत विश्वगुरु झाला तर ठेकेदारी...

सरसंघचालक भागवत पुण्यात सुरु असलेल्या व्याख्यानमालेत बोलत होते. विश्वगुरु भारत हे या व्याख्यान मालिकेचं नाव होतं. यावेळी बोलताना त्यांनी वेगवेगळ्या मुद्द्यांवर भाष्य केलं.भारत विश्वगुरु झाला पाहिजे असं प्रत्येक भारतीयाला वाटतं, असं सांगून भारत विश्वगुरु झाला तर ठेकेदारी बंद होईल, कारण भारताची निर्मितीच परोपकारासाठी झालीय असं त्यांनी सांगितलं. 

राम मंदिरासारखी आंदोलने अन्य प्रार्थनास्थळी करणं योग्य नाही- मोहन भागवत

आगामी वीसेक वर्षात भारत विश्वगुरु होईल, असं भाकीतही त्यांनी वर्तवलं. अयोध्येत राम मंदिर व्हावं असं हिंदूना वाटायचं. त्याप्रमाणे राम मंदिर पूर्णही झालं. मात्र राम मंदिर झालं म्हणजे नेता होता येत नाही, असंही त्यांनी बजावलं. राम मंदिरासारखी आंदोलने अन्य प्रार्थनास्थळी करणं योग्य नाही, असंही ते म्हणाले. देशात अल्पसंख्य किंवा बहुसंख्य असं काही नाही, सर्वांना त्यांच्या इच्छेनुसार पूजा प्रार्थना करण्याची संधी मिळायला हवी, असं मतही त्यांनी व्यक्त केलं. 

हेही वाचा :

Prakash Ambedkar : संघ आणि भाजप सारखे खोटारडे दुसरे संघटन नाही, मोहन भागवत यांना माझं चॅलेंज.... प्रकाश आंबेडकरांचा घणाघात

RSS Chief Mohan Bhagwat : संघाचे प्रमुख मोहन भागवत आणि मुकेश अंबानी यांची भेट, नेमकं कारण काय? 

Suhas kande on Chhagan Bhujbal : छगन भुजबळांना मंत्रिमंडळातून डच्चू, कट्टर विरोधक सुहास कांदेंचा मोठा दावा; म्हणाले...