Mohan Bhagwat, Pune : "आपला देश आता संविधानाने चालतो. जे निवडून येतील ते राज्य चालवतील. इंग्रजांच्या कारस्थानामुळे पाकिस्तान निर्माण झालं. ज्याची त्याची पूजा ज्याला त्याला लकलाभ पण नियम पाळले गेले पाहिजे. आपलं राष्ट्र इंग्रजांनी तयार केलेले नाही आपलं राष्ट्र सनातनी राष्ट्र आहे", असं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले. ते पुण्यात बोलत होते.
मोहन भागवत म्हणाले, संविधानाची प्रस्तावना, नागरिकांचे अधिकार संसद बदलू शकत नाही.... नागरिकांनी नियम पाळले पाहिजे. 20 वर्षात भारत विश्वगुरू होऊ शकतो. विश्वगुरु भारत झाला पाहिजे असं आपल्या सगळ्यांना वाटत कारण आपण सगळे भारतीय आहोत. विश्वाला गुरुची आवश्यकता आहे का? पूर्वीपेक्षा आजचे जग फार सुखी आहे. जगाचा संबंध एकमेकांशी वाढलाय विचाराने जग पुढे जात आहे.
जो कोणी आतापर्यंतचा जागाचा गुरु आहे त्याचा मार्गदर्शनात सगळं ठीक चाललं आहे. सुख सुविधा वाढल्या आहेत. पण मनुष्याजवळ सुख आहे का? घटस्फोटाचे प्रमाण वाढले.
युद्ध थांबत नाहीये कुठे ना कुठे युद्ध सुरु आहे कट्टरपणा कमी होत नाहीये.... पर्यावरणाचा ऱ्हास होतोय... जमीन प्रदूषित झालीय... पाहिजे तेव्हा पाऊस येत नाही येतो तेव्हा सगळं घेऊन जातो. हे आजच्या परिस्थितीचे वर्णन आहे. जगात सगळे सुखी होऊ शकत नाही. जगात 4 टक्के लोक जगातील 80 टक्के संसाधन वापरते. जगात हा नियम आहे... सगळ्याच चांगले होणार नाही. बलवान असतील त्यांच फक्त चांगलं होणार... जगात अस्तित्वासाठी संघर्ष सुरु आहे. मानव जात एकच आहे असं म्हणायची चाल आहे.
सायन्सच्या आधारवर सर्व सुरु आहे. ते देखील बदलत असतं. सायन्सचा फायदा ज्यांचा हाती साधनसंपत्ती होती त्यांनी घेतला. आज अशी स्तिथी आहे एक बाजू उजळ आहे.... मानव म्हणून गौरवशाली आहे... पण दुसरी बाजू पृथ्वीचा विनाश करणारी आहे.... त्यामुळे लोक चिंतेत आहेत. या जगात एक राक्षशी प्रवृत्ती आहे तिला वाटत आम्ही म्हणू तस झालं पाहिजे... दुसरी प्रवृत्ती दैवी प्रवृत्ती आहे ती म्हणते आम्हाला जगूद्या तुम्हीही जगा.
जगाला गुरुची आवश्यकता आहे आणि तो भारत होऊ शकतो. आपल्याला महासत्ता होईच नाही. कारण महासत्ता झाल्यावर काय करतात लोक ते आपल्याला माहित आहे. श्रीलंका भरतासोबत कशी वागली ते आपल्याला माहित आहे पण श्रीलंकेला पहिली मदत नेहमी भारताने केली. विश्वगुरु भारत झाला पाहिजे तर आपण काय कराव... या देशाची भक्ती आम्ही का करावी असा प्रश्न तरुणांना पडत असेल. भारत विश्वगुरु झाला तर ठेकेदारी बंद होईल... आमचं राष्ट्र परोपकारासाठी तयार झालेय. इतरांच्या देवी दैवताचे हाटाळणी करू नये... आम्ही सगळ्याबर मिळून मिसळून जगभरात राहतोय. राम मंदिर झालं पाहिजे असं हिंदूना वाटत होतं.... पण असं झालं म्हणजे नेता होतं येत असं नाही.
इतर महत्त्वाच्या बातम्या
Mumbai Crime : मुंबई महापालिकेतील अधिकाऱ्याला 75 लाखांची लाच घेतल्याप्रकरणी लाच लुचपत विभागाकडून अटक