बारामती: बारामती पुन्हा एकदा हादरली आहे. काही दिवसांपुर्वी एका महाविद्यालयामध्ये कोयत्याने वार करून विद्यार्थ्यांचा खून करण्यात आला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा बारामतीतील क्रिएटिव्ह अकॅडमी ते तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयाच्या रस्त्यावर रात्री 23 वर्षीय युवकाचा कोयत्याने निघृण वार करत खून करण्यात आला आहे. या प्रकरणाने बारामती पुन्हा एकदा हादरली आहे. रात्री साडेदहाच्या सुमारास प्रगतीनगर परिसरातील क्रिएटिव्ह अकॅडमी ते तुळजाराम चतुरचंद कॉलेज रस्त्यावर अनिकेत सदाशिव गजाकस या युवकावर कोयत्याने वार करण्यात आले. या घटनेत तरूणाचा मृत्यू झाला आहे. (Baramati Crime News)
कोयत्याने वार केल्याने गंभीर जखमी झाल्याने अनिकेत गजाकस याचा मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, अनिकेत हा मुलीशी बोलत असल्याच्या कारणावरून हा खून झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. याप्रकरणी अभिषेक सदाशिव गजाकस यांच्या फिर्यादीवरुन बारामती शहर पोलिसांनी तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहाय्यक निरीक्षक गजानन ठेके करत आहेत. या प्रकरणाने बारामती पुन्हा एकदा हादरली आहे. गेल्या सहा महिन्यातील हा तिसरा खून आहे.(Baramati Crime News)
या प्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार, रात्री साडे दहा ते अकरा वाजण्याच्या सुमारास प्रगतीनगर परिसरातील क्रिएटिव्ह अकॅडमी ते तुळजाराम चतुरचंद कॉलेज रस्त्यावर अनिकेत सदाशिव गजाकस या युवकावर कोयत्याने वार करण्यात आले. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या अनिकेत गजाकस याचा मृत्यू झाला. प्राथमिक माहितीनुसार तो मुलीशी बोलत असल्याच्या कारणावरून हा प्रकार घडल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.(Baramati Crime News)
या प्रकरणी पोलिसांनी तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. नंदकिशोर पंजाबराव अंभोरे (रा प्रगतीनगर ता बारामती जि पुणे), महेश नंदकुमार खंडाळे (रा. तांदुळवाडी रोड जिजामातानगर बारामती जि.पुणे) संग्राम खंडाळे अशी या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी अभिषेक सदाशिव गजाकस यांनी बारामती शहर पोलिसांकडे फिर्याद दिली असून, पोलिसांनी तीन जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहाय्यक निरीक्षक गजानन चेके करत आहेत.
काँलेजमध्ये घुसून विद्यार्थ्याचा खून
सप्टेंबर महिन्यामध्ये बारामतीच्या टीसी कॉलेजमध्येच विद्यार्थ्यांचा खून करण्यात आला होता. कोयत्याने वार करून, चाकू खुपसून विद्यार्थ्याचे आयुष्य संपवण्यात आलं होतं. अथर्व पोळ असे खून झालेल्या विद्यार्थ्याचे नाव होतं. तो ज्युनिअर कॉलेजमध्ये शिकत होता.या खूनप्रकरणी ओंकार भोईटे आणि त्याच्या साथीदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. अथर्ववर कोयत्याने वार करण्यात आले. यानंतर त्याच्या पोटात चाकू खुपसण्यात आला होता. (Baramati Crime News)