पुणे : पुणे लोकसभेच्या आखाड्यात दोन पैलवानांना  (Pune Lok Sabha Constituency) उमेदवारी देण्यात आली आहे. पुण्यात महाविकास आघाडीकडून रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) तर महायुतीकडून मुरलीधर मोहोळांना (Murlidhar Mohol) उमेदवारी देण्यात आली आहे. दोघेही तगडे उमेदवार आहे. दोघांमध्येही पुण्यात तगडी लढत पाहायला मिळायला आहे. त्यातच एकमेकांवर आरोप प्रत्यारोप आणि टीका टिपण्णी सुरु झाल्या आहेत. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील वाडेश्वर कट्ट्यावर दोघेही एकत्र आले होते. त्यावेळी रवींद्र धंगेकरांच्या एका उत्तराने अनेकजण अवाक झालेले दिसले. मुरलीधर मोहोळ आवडतात का?, असा प्रश्न रवींद्र धंगेकरांना विचारण्यात आला त्यावर मला फक्त पुणेकर आवडतात, असं ते म्हणाले. 

 धंगेकर नेमकं काय म्हणाले?

 मोहोळांसदर्भात धंगेकरांना यावेळी अनेक प्रश्न विचारण्यात आले. त्यावर धंगेकरांनी त्यांच्या खास शैलीत उत्तरं दिले. ते म्हणाले की मुरलीधर मोहोळांसोबत मी फार काम केलं नाही. मी त्यांच्या फार संपर्कात आलो नाही. महापालिकेत महापौर असताना काम केलं पण ते काम मोहोळांकडे कधीही नव्हतं. मुरलीधर मोहोळ आवडतात का?, विचारल्यावर त्यांनी क्षणभराचा विचार न करता मला पुणेकर आवडतात, असं उत्तर दिलं. मला मुरलीधर मोहोळांची एकही गोष्ट आवडत नाही आणि कधीही आवडली नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं. 

वसंत मोरे अन् मी भाऊ भाऊ...

 मात्र वसंत मोरेंसंदर्भात धंगेकर भरभरुन बोलले. धंगेकर म्हणाले की, वसंत मोरे आणि मी एकत्र काम केलं आहे. शिवाय आम्ही भाऊ-भाऊ आहोत. ते एकेकाळी माझे सहकारीदेखील होते. 

भाजपवर सडकून टीका

धंगेकर पुढे म्हणाले की,  काम न करणाऱ्यावर टीका होणार आहे. ज्यांनी काम केलं त्यांच्यावर कधीही टीका केली जात नाही. 10 वर्ष ज्यांनी काम केलं त्यांनी सगळ्या लोकांच्या प्रश्नांची उत्तरं द्यावी लागणार आहे. एवढे वर्ष काय केलं असं विचारतात मात्र 50 वर्षात 20 वर्ष भाजपनेच सत्ता केली आहे. देशाची रचना एका दिवसांत तयार झालेलं नाही. या रचनेसाठी मोठा काळ लोटला गेला आहे. हे सगळं आता लपवण्यांचं काम विरोधकांकडून सुरु असल्याचा आरोप रवींद्र धंगेकरांनी केला आहे.  

इतर महत्वाची बातमी-

-Eknath Shinde : अमरावती, रत्नागिरी-सिंधुदुर्ग भाजपच्या वाट्याला, एकनाथ शिंदेंच्या हातून दोन जागा निसटल्या!

- Maharashtra Lok Sabha: भाजपचे 24, ठाकरेंचे 17, अजितदादांचे 2 उमेदवार जाहीर; कोणत्या मतदारसंघात काय चित्र?