Vijay Shivtare : शिवसेनेचे माजी मंत्री विजय शिवतारे (Vijay Shivtare) यांची रात्री उशीरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यासोबत वर्षा निवासस्थानी बैठक झाली. मुख्यमंत्री शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यासोबत शिवतारेंची सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती मिळतेय. दरम्यान, आज शिवतारे पत्रकार परिषद घेऊन आपली पुढील भूमिका जाहीर करणार आहेत. त्यामुळं तोडगा निघणार का? शिवतारे खरच बारामती लोकसभा मतदारसंघातून माघार घेणार का? असे प्रश्न उपस्थित केले जातायेत. 


पुरंदर तालुक्यातील विविध समस्यांबाबत चर्चा 


दरम्यान, रात्री झालेल्या बैठकीत शिवतारे यांच्या  पुरंदर तालुक्यातील नागरिकांच्या विविध समस्यांबाबत प्रामुख्याने चर्चा करण्यात आली. ही चर्चा अत्यंत सकारात्मक झाल्याची माहिती मिळतेय. विजय शिवतारे यांच्या मनातील सर्व प्रश्नांवर तोडगा काढण्यात यश आले आहे. त्यामुळं आपण या बैठकीतील चर्चेबाबत पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका प्रसार माध्यमांसमोर विस्तृतपणे मांडणार असल्याचे शिवतारे यांनी ठरवले आहे. या बैठकीवेळी शिवसेना आमदार भरतशेठ गोगावले हेदेखील उपस्थित होते.


बारामतीमधून अपक्ष निवडणूक लढवण्याची शिवतारेंनी घेतली होती भूमिका 


सध्या बारामती लोकसभा मतदारसंघाची जोरदार चर्चा सुर आहे. इथून सुप्रिया सुळे यांच्या विरोधात महायुतीकडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. त्यामुळं या मतदारसंघातनू आपण अपक्ष निवडणूक लढवणार असल्याची भूमिका माजी मंत्री विजय शिवतारे यांनी घेतली होती. यावेळी त्यांनी अजित पवार यांच्यावर जोरदार टीका देखील केली होती. कोणत्याही परिस्थितीत मी बारामती निवडणूक लढवणारचं असा निर्धार शिवतारेंनी केला होता. मात्र, रात्री उशीरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी शिवतारेंची मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत बैठक झाली. या बैठकीत सकारात्मक तोडगा निघल्याचे बोलेल जात आहे. 


आज विजय शिवतारे पुढील भूमिका जाहीर करणार


दरम्यान, आज विजय शिवतारे पत्रकार परिषद घेत पुढील भूमिका जाहीर करणार आहेत. त्यामुळं जोपर्यंत शिवतारे यांची पत्रकार परिषद होत नाही, तोपर्यंत ते पुढील निर्णय नेमका काय घेणार हे सांगता येणार नाही. दरम्यान, विजय शिवतारेंनी बारामतीमध्ये विरोध केल्यामुळं अजित पवार यांची चिंता वाढली होती. त्यामुळं यावर तोडगा काढण्याचा मार्ग सुरु आहे. 


महत्वाच्या बातम्या:


विजय शिवतारे बारामतीतून लढण्यावर ठाम! थेट आकडेवारी सांगत मांडलं विजयाचं गणित; अजित पवारांची डोकेदुखी वाढणार!