पुणे : पुण्यामध्ये तब्बल 30 कोटी रुपयांची खंडणीची मागणी केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे बड्या व्यावसायिकांनीच खंडणी मागितली असून याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करुन घेत चौकशी सुरु केली आहे.


पुण्यातील व्यावसायिक वेनिसा डिसूजा आणि अली जाफरी यांच्यावर खंडणी मागितल्याचा आरोप करण्यात आला आहे. कॅम्प येथे राहणाऱ्या हेमंत मोटाडू यांनी याबाबत तक्रार दिली आहे. या तक्रारीवरून वेनिसा डिसूजा आणि अली जाफरी यांच्याविरुद्ध लष्कर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. पुणे पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत.


एक कोटी 36 लाख मोबदला देऊन हेमंत मोटाडू यांनी 2013 मध्ये चऱ्होली येथे 5 हेक्टर 35 आरव्ही जमीन खरेदी केली होती. हिरानंदाणी प्रॉपर्टी मुंबई यांच्या सोबत मोटाडू यांचा रीतसर व्यवहार झाला होता. मात्र हीच जमीन हिरानंदानी यांना अली जाफरी यांनी 2005 मध्ये हस्तांतरित केली होती. मात्र 2012 मध्ये जाफरी याने कार्यालयातच असलेल्या डिसुझा यांना बनावट कागदपत्रे बनवत व्यवहार केला होता. हीच कागदपत्रे दाखवत मला 30 कोटी रुपये दे मगच मी तुला या जमिनीची एनओसी देतो. अन्यथा मी तुझे नुकसान करेन, अशी धमकी दिल्याचा आरोप व्यावसायिक हेमंत मोटाडू यांनी  केला आहे.


दरम्यान पोलिसांच्या तपासात काय ते समोर येईलच. पण बड्या व्यावसायिकडे एवढ्या मोठ्या खंडणीची मागणी केल्याने पुण्यात मोठी खळबळ उडाली आहे. त्यामुळे खंडणीखोरांचा धुमाकूळ कधी थांबणार हा मोठा प्रश्न उभा राहिलाय. 


इतर बातम्या