मुंबई : कोरोनासंबंधी RTPCR टेस्टचं बनावट सर्टिफिकेट तयार करुन विकणाऱ्या एका सायबर कॅफे चालकांना मुंबई पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. कोरोना निगेटिव्ह असल्याचं खोटं सर्टिफिकेट आरोपी करुन देत असत. दक्षिण मुंबईतून पोलिसांना या सायबर कॅफेच्या ऑपरेटरला पोलिसात अटक करण्यात आली आहे. तसेच त्याचे संगणक आणि प्रिंटर देखील जप्त करण्यात आले आहे. 


मुंबई पोलिसांना माहिती मिळाली होती की, एक व्यक्ती दक्षिण मुंबईत सायबर कॅफे चालवते. या सायबर कॅफेत बनावट आरटीपीसीआर सर्टिफिकेट देऊन लोकांकडून त्याबदल्यात पैसे घेतले जात होते, याबाबतची माहिती मुंबई क्राईम ब्रान्चला मिळाली होती.


या माहितीच्या आधारावर पोलिसांना या सायबर कॅफे चालकाला रंगे हात पकडण्याच निर्णय घेतला. यासाठी मुंबई क्राईम ब्रान्चचे अधिकारी बोगस ग्राहक बनले आणि त्याच्याकडून बनावट आरटीपीसीआर सर्टिफिकेटची मागणी केली. त्यानंतर त्या व्यक्तीने कोणत्याही तपासणीशिवाय RTPCR चा अहवाल काढला आणि तो फक्त 10 मिनिटात त्यांना दिला. त्यानंतर काही वेळातची पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या.


सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईत अनेक ठिकाणी अशा बोगस कागदपत्र विक्रीचा काळा धंदा सुरु आहे. मुंबईमध्ये असे बरेच लोक आहेत ज्यांना लसीचे दोन डोस मिळाले नाहीत. मात्र ट्रेनमध्ये प्रवास करण्यासाठी आरटीपीसीआर टेस्टची निगेटिव्ह रिपोर्ट असावा लागतो किंवा लसीचे दोन्ही डोस लागतात. त्यामुळे लोक रेल्वे प्रवासाला लागणार पास मिळवण्यासाठी 700 रुपये खर्चून बोगस आरटीपीसीआर रिपोर्ट तयार करुन घेत आहेत. 


इतर बातम्या