पुणे : बारामती तालुक्यातील निंबुत गावात बैलाच्या व्यवहारातून रणजित निंबाळकर (Ranjit Nimbalkar) यांच्यावर गोळीबार करण्यात आला होता. रणजित निंबाळकर यांच्यावर उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर या प्रकरणातील मुख्य आरोपी गौतम काकडे (Gautam Kakade) याला अटक करण्यात आली आहे.सुंदर नावाच्या बैलाच्या व्यवहारातून काकडे आणि निंबाळकर यांच्यात वाद निर्माण झाला होता.  


सुंदर नावाच्या बैलाच्या व्यवहारातून झाला निंबाळकर आणि काकडे यांच्यात वाद झाला होता. यातून रणजित निंबाळकर यांच्यावर गोळीबार झाला होता.  रणजित निंबाळकर यांच्यावर गोळीबार झाल्यानंतर गौतम काकडे फरार झाले होते. यानंतर गौतम काकडे यांच्या अटकेसाठी पोलीस ठाण्यासमोर आंदोलन करण्यात आलं होतं.  


गोळीबारात जखमी झालेल्या रणजित निंबाळकर यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्यानंतर  गौतम काकडे यांना पोलिसांनी केली अटक केली आहे.गौतम काकडे यांना अटक करा यासाठी रणजित निंबाळकर यांच्या पत्नीने आत्मदहनाचा इशारा दिला होता. या प्रकरणात गौरव काकडे आणि शहाजी काकडे यांना पोलिसांनी आधीच अटक केली आहे. 


नेमक प्रकरण काय? 


एक वर्षांपूर्वी सर्जा हा बैल निंबुत येथील गौतम काकडे यांच्याकडून 61 लाख रुपयांना रणजित निंबाळकर यांनी विकत घेतला होता. त्यानंतर 24 जून 2024 रोजी रणजित निंबाळकर यांच्याकडील सुंदर नावाचा बैल गौतम शहाजी काकडे यांनी 37 लाख रुपयांना विकत घेतला. यावेळी गौतम काकडे यांनी विसारापोटी पाच लाख रुपये दिले होते. उर्वरित 32 लाख रुपये येणे बाकी होते. 


दरम्यान व्यवहार झाला, त्याच दिवशी गौतम काकडे यांनी सुंदर हा बैल खटाव तालुक्यातील बुध येथून त्यांच्या घरी निंबुतला नेला. उर्वरित पैसे आणण्यासाठी गेले असताना त्यांच्यामध्ये वाद झाला आणि त्यावरून रणजित निंबाळकर यांच्यावर  गोळीबार झालेला आहे. या संदर्भात पोलीस अधिक तपास करत आहेत. रणजित निंबाळकर यांच्यावरती पुण्यातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु होते.मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. 


शर्यतीच्या बैलाच्या व्यवहारातून झालेल्या वादामुळे बारामती तालुक्यातील निंबुत येथे झालेल्या गोळीबारामुळं खळबळ उडाली होती. रणजित निंबाळकर हे फलटण भागात पोलीस आणि सैन्य दलातील भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र चालवत होते. गेल्या दोन वर्षांपासून ते बैलगाडा शर्यतीत उतरले होते. रणजित निंबाळकर यांनी सुंदर बैलाची खरेदी माळशिरसमधून 21 लाख रुपयांना केली होती. गोळीबाराच्या घटनेमुळं बैलगाडा शर्यतप्रेमींना देखील धक्का बसला आहे. 


संबंधित बातम्या :



बारामतीत शर्यतीच्या वाद, गोळीबारातून एकाचा उपचारादरम्यान मृत्यू; सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या माजी अध्यक्षांना अटक