मुंबई : आपण अनेकवेळा डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय मेडिकलमधून औषधे घेतो. विशेष म्हणजे डॉक्टारांच्या चिठ्ठीशिवाय केमिस्टसुद्धा सरार्स औषधे देतात. यात अँटी-बायोटिक्स सारख्या औषधांचाही समावेश असतो. मात्र, याचे भयानक दुष्परिणाम होत असल्याचे समोर आले आहे. यात मल्टी ड्रग रेसिस्टंट बॅक्टेरिया म्हणजे अनेक औषधांना दाद न देणारा विषाणू होत आहे. महत्वाचे म्हणजे हा आजार संसर्गजन्य असल्याचेही तज्ज्ञांचे म्हणणे आहे.


डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, हा संसर्ग सरसकट सतत अँटीबायोटीक्स औधषं घेण्याच्या सवयीमुळे झाला आहे. हा संसर्ग अनेक अँटीबायोटीक्सना दाद देत नाही. आता, ज्या व्यक्ती या संसर्गबाधित व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या त्या व्यक्तींना देखील या संसर्गाची लागण होते. शिवाय त्यांनाही अँटीबायोटीक्स दाद देत नाहीत.


पुण्याच्या रूबी हॉल क्लिनिकमध्ये एक 65 वर्षीय व्यक्ती उपचारांसाठी आले होते. त्यांना चालण्यास समस्या, श्वास घेण्यास अडचण, अवयव निकामी तसेच ब्लड पॉयसनिंगच्या तक्रारी उद्भवल्या होत्या. या सर्व तक्रारी त्यांना जाणवत होत्या कारण त्यांच्या शरीराला मल्टी ड्रग रेसिस्टंट बॅक्टेरिया (अनेक औषधांना दाद न देणारा विषाणू) संसर्ग झाला होता.


भारतात आतापर्यंत 60 लाख कोविड रुग्ण ठणठणीत बरे; महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोनामुक्त


रूबी हॉल क्लिनिकमधील डॉक्टरांनी Methicillin-Resistant Staphylococcus Aureus (MRSA) या संसर्गाचे निदान केले. हे फार दुर्मिळ प्रकरण होते. या व्यक्तीने एकतर यापूर्वी सरकरट अँटीबायोटीक्सचे सेवन केले असेल. किंवा हा संसर्ग असलेल्या व्यक्तीच्या संपर्कात आल्याने त्याची लागण झाली असेल.


रूबी हॉल क्लिनिकच्या क्रिटीकल केअर मेडीसीन विभागाच्या प्रमुख डॉ. प्राची साठे म्हणाल्या, आम्हाला हा संसर्ग कोणत्या विषाणूंपासून सुरू झाला हे शोधायचे होते. त्यासाठी केलेल्या तपासणीने आमच्या सर्वांना आश्चर्यचकीत केले. कारण हा एक विषाणू होता MRSA ज्यामुळे हा दुर्मिळ संसर्ग झाला. पाश्चात्य देशांच्या तुलनेत भारतात MRSA ची प्रकरणे फारच कमी आहेत. परंतु, या प्रकरणातून असे दिसून आले की MRSAचा संसर्ग समुदायातून येऊ लागला आहे. याचे कारण म्हणजे अँटीबायोटीक्सचा सरसकट वापर.


डॉक्टरांच्या म्हणण्याप्रमाणे, हा संसर्ग रूग्णालय अधिग्रहित आहे. MRSA संसर्ग सामान्यत: एखाद्या संक्रमित जखमेच्या संपर्कात किंवा संक्रमित हातांनी आरोग्य सेवा देणाऱ्यांद्वारे पसरतो. पण या प्रकरणात हा संसर्ग समूदायातून किंवा सरसकट अँटीबायोटीक्सच्या सेवनाने झाला आहे.


Special Report | कोरोनाची पहिली लस कुणाला देणार? लस वाटपासाठी राज्य सरकारची काय तयारी?