Ramesh Bagve Resign: पुणे शहर काँग्रेस शहराध्यक्ष आणि माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे यांनी पुणे शहर काँग्रेस शहराध्यक्ष पदाचा राजीनामा दिला. त्यांच्यासोबत प्रदेश सरचिटणीस अॅड. अभय छाजेड यांच्यासह रोहित टिळक यांनी राजीनामा दिला आहे. काँग्रेसने केलेल्या ठरावानुसार त्यांनी हे राजीनामे दिले आहेत, असं सांगण्यात येतंय.


का दिला राजीनामा?


पाच किंवा त्यापेक्षाल अधिक कालावधी एका पदावर असलेल्यांनी पदे रिक्त करण्याचा कॉंग्रेसने ठराव दिला होता. त्या ठरावानुसार रमेश बागवे, अभय छाजेड, रोहित टिळक यांनी राजीनामा दिला आहे. पुण्यात येत्या काही महिन्यात निवडणुका आहेत. त्यामुळे पुणे शहराला नवा शहराध्यक्ष लवकरच निवडावा लागणार आहे.रमेश बागवे यांना शहराध्यक्षपदी निवड होऊन सहा वर्षे झाली आहेत तर मागील पाच वर्षांहून अधिक काळापासून छाजेड आणि टिळक पक्षाचे काम करीत आहे तर . त्यामुळे या सर्वांनी पक्षाच्या आदेशाचे पालन करीत आपल्या पदाचे राजीनामे प्रदेश कॉंग्रेसकडे सादर केले..


'एक व्यक्ती एक पद' ठराव
 काही आठवड्यांपु्र्वी राजस्थानमध्ये काँग्रेसचं चिंतन शिबीर झालं. त्या शिबीरात 'एक व्यक्ती एक पद', असा ठराव करण्यात आला होता.या ठरावानुसार शिर्डीत झालेल्या महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशच्या अधिवेशनात 51 जणांनी तात्काळ राजीनामे दिले. त्यात रमेश बागवे आणि प्रदेश सरचिटणीस ऍड. अभय छाजेड यांच्यासह रोहित टिळक यांचाही समावेश आहे.  


नव्या शहराध्याक्षाचा शोध सुरु
बागवे यांनी राजीनामा दिल्यामुळे आता शहराध्यक्षपदावरून पुन्हा एकदा शहर कॉंग्रेसमध्ये हालचाली सुरू झाल्या आहेत. गेली सहा वर्ष रमेश बागवे यांच्याकडे पुणे काँग्रेस शहराध्यक्ष पद होतं. या सहा वर्षात बागवे यांनी महत्वाची कामगिरी बजावली. मात्र त्यांनीच राजीनामा दिल्याने आता नवे शहराध्यक्ष कोण असतील? याच्या चर्चा सुरु आहेत.