Rajya Sabha election 2022: राज्यसभेची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी महाविकास आघाडीकडून प्रयत्न सुरू आहेत. बिनविरोध निवडणुकीसाठी भाजपने तिसरा उमेदवार मागे घ्यावा, यासाठी महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. मात्र या भेटीत काही साध्य झालं नाही. महाविकास आघाडीचे नेते भाजपकडे ऑफर द्यायला आले होते. मात्र भाजपने ही ऑफर नाकारली आहे. महाविकास आघाडीला मतांची जुळवाजुळव करणे शक्य नाही. जिंकण्याचा आत्मविश्वास असता तर ते ऑफर द्यायला आले नसते, असं वक्तव्य भाजपनेते प्रविण दरेकरांनी केलं आहे.


भारतीय जनता पार्टीने उमेरवारीचा अर्ज हा जिंकण्यासाठीच केला आहे. त्यामुळे गेल्या निवडणुकीप्रमाणे तिसरा उमेरदवार भाजपचा निवडून येणार आहे, असा विश्वास त्यांनी पुण्यात एबीपी माझाशी बोलताना व्यक्त केला आहे.


आमची 29-30 मतं फक्त भाजपची आहेत.शिवसेना,काँगेस, राष्ट्रवादी हे तिघे मिळूनही भाजपसोबत बरोबरी करु शकत नाही. मतांची गरज दोघांनाही आहे.आम्ही तर जिंकण्यासाठीच कार्यक्रम रिंगणात उतरलो आहोत. त्यामुळे आमचा उमेदवार निवडून येईल हे नक्की, असं ठाम मत त्यांनी यावेळी व्यक्त केलं आहे. 


दरम्यान, आमदारांचा घोडेबाजार सुरु आहे, असा आरोप संजय राऊतांनी केला होता. त्यावर बोलताना ते म्हणाले की आमदारांना घोड़ेबाजारात उभं करणे  हा आमदारांचा अपमान आहे .आमदार काही बाजारातली विकाऊ वस्तु नाही आहे ते किमान तीन लाख लोकांचं प्रतिनिधीत्व करत असतात. 


संजय राऊतांना आमदार विकाऊ वस्तू वाटत असेल तर ते निवडणुकीच्या रिंगणात आहे. आमजदारांचा स्वाभिमान दुखावला तर संजय पवार निवडून यायचे आणि संजय राऊत यांना धोका होईल. त्यामुळे आता तोंड सांभांळून वागले  तर त्यांच्या फायद्याचं राहिल, असा सल्लाही त्यांनी राऊतांना दिला आहे.