पिंपरी-चिंचवड : केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) त्यांच्या शैलीतच प्रचारात रंगत आणताना दिसत आहेत. मावळ लोकसभेत महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणेंच्या प्रचारार्थ सादर केलेल्या कविता ऐकून उपस्थितांनी आठवलेंना दाद दिली. हरणे, बारणे अन् कारणे या शब्दांचं यमक जुळवून बारणेंच्या विजयाचा संकल्प आठवलेंनी केला. तर नारा, सारा, तारा अन् बारा यांची सांगड घालून मोदी सरकार काँग्रेसचे कसे वाजवणार बारा हे ही आठवलेंनी कवितेतून सादर केलं. 


मावळ लोकसभा मतदारसंघातील उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारार्थ रामदास आठवले यांनी सभा घेतली. पिंपरी-चिंचवडमध्ये ही सभा पार पडली. यासभेला मोठी गर्दी झाली होती. रामदास आठवले यांनी त्यांच्या शैलीतील कवितेतून बारणेंचा प्रचार केला. ज्यांच्या नशिबात नाही हारणे, त्यांचं नाव आहे श्रीरंग आप्पा बारणे, असं म्हणत त्यांनी थेट बारणेंचं कवितेतून कौतुक केलं. यावेळी टाळ्यांचा गडगडाट झाला. 


त्यानंतर त्यांनी पंतप्रप्रधान नरेंद्र मोदींना तिसऱ्यांना देशाचं पंतप्रधान करायचं आहे म्हणत 'नरेंद्र मोदींना निवडून देण्यासाठी तुमच्यासमोर अनेक आहेत कारणे, का निवडून येणार नाहीत आप्पा बारणे...'..गेल्या 10 वर्षापासून देशाला अत्यंत  गतिशील दिशेने घेऊन जाणारे नरेंद्र मोदी यंदातिसऱ्यांदा प्रधानमंत्री होणार आहेत. नरेंद्र मोदी  या देशामधला अत्यंत खमक्या नेता आहे. जेवढ्या लोकांना एकत्र राहायचं असेल त्यांनी एकत्र या आणि त्यांना पंतप्रधान करा.  सर्वसामान्य माणसाला वरती आणण्याचा प्रयत्न करत आहे. त्यांना हरवणं येड्याचं काम नाही म्हणत त्यांनी नरेंद्र मोदींच्या कामाचं कौतुक केलं. 



'अब की बार, आप्पा खासदार' बारणेंचा स्वतःसाठीचं नारा.


याच सभेत बोलताना श्रीरंग बारणे म्हणाले की,  सलग तिसऱ्यांदा नरेंद्र मोदींना पंतप्रधान करण्यासाठी महायुती लोकसभेच्या निवडणुकीला सामोरं जातेय. म्हणूनच 'अब की बार, फिरसे मोदी सरकार' असा नारा भाजपने दिलाय. हाच धागा धरून मावळ लोकसभेतील महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणेंनी स्वतःसाठीचं एक नारा देऊन टाकला. 'अब की बार, फिरसे अप्पा (श्रीरंग) बारणे खासदार' हा नारा बारणेंनी भर सभेत जाहीर केला. केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले त्याच मंचावर उपस्थित होते. आता बारणेंचा हा नारा जनता स्वीकारणार का? हे पाहणं औत्सुक्याचे ठरेल.


पाहा व्हिडीओ :



 


इतर महत्वाची बातमी-


आईच्या योग्यतेवर अजितदादांचं भाष्य, रोहित पवारांचं जशास तसं उत्तर 


माढ्यात नवा ट्विस्ट! अभिजित पाटील यांनी लोकसभेला भाजपाला पाठिंबा दिल्याने महाविकास आघाडीला धक्का