पुणे : मुंबई, पुणे, सोलापूर सारख्या शहरांमध्ये कोरोनाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव आहे. कोरोनाबाधित रुग्णांची संख्या याठिकाणी दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे या शहरांमध्ये जीवनावश्यक वस्तुंची वाहतूक करणाऱ्या ट्रक चालकांना, व्यापाऱ्यांना खबरदारी म्हणून क्वॉरंटाईन करण्याचे आदेश इंदापूरच्या तहसीलदारांनी दिले आहेत.
देशात लॉकडाऊनची अंमलबजावणी होऊन एक महिना झाला आहे. सध्या इंदापूर शहर व तालुक्यात एकही कोरोनाचा रुग्ण आढळलेला नाही. मात्र कोरोना व्हायरस इंदापूरपासून दूर राहावा, यासाठी प्रशासन कडक पावलं उचलताना दिसत आहे. म्हणूनच लॉकडाऊनमध्ये अत्यावश्यक सेवांची वाहतूक करणाऱ्या ट्रक चालक, व्यापारी यांच्यावर प्रशासनाने लक्ष केंद्रीत केलं आहे. चालक आणि व्यापारी हॉटस्पॉट असणाऱ्या ठिकाणी जात असल्याने आणि पुणे, मुंबई आणि सोलापूर या ठिकाणी कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढतच असल्याने खबरदारी म्हणून इंदापूरच्या तहसीलदार यांनी एक आदेश काढला आहे.
या आदेशानुसार इंदापूर शहर व तालुक्यातून अत्यावश्यक सेवेसाठी (म्हणजेच यात भाजीपाला/भुसार अशासाठी) जे पुणे आणि मुंबईमध्ये जातात, अशा सर्वांना पुणे, मुंबई दौरा करून आल्यानंतर कुटुंबाशी किंवा गावातील इतर कोणाच्याही संपर्कात येऊ नये, याची काळजी घेण्यासाठी त्यांनी गावांमध्ये जायचेच नाही. एखाद्या शाळेत किंवा महाविद्यालयात राहणे व स्वतःला क्वॉरंटाईन करून घेणे, यावर लक्ष ठेवण्याच्या सूचना तालुक्यातील सर्व अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे भविष्यकाळातही इंदापूर शहर व तालुक्यात कोरोनाचा संसर्ग होऊ, नये यासाठी ही कडक अंमलबजावणी केली जात आहे
संबंधित बातम्या
- PM Modi | 3 मे चा दुसरा लॉकडाऊन संपल्यानंतर काय? पंतप्रधानांकडून सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना महत्वाच्या सूचना
- PM Modi | कोरोना दीर्घ काळासाठी आपल्यात राहणार हे समजून धोरणं ठरवा : पंतप्रधान मोदी
- कोरोनाच्या रॅपिड टेस्ट किटमध्ये नफेखोरी, नफेखोरी करणाऱ्या कंपनीला कोर्टानं फटकारलं
Vaccine on Corona | कोरोनावरील लस भारतात तयार होणार! 'सीरम' इन्स्टिट्यूटचे अदर पुनावाला यांची माहिती