पुणे : पुणेकर कधी काय शक्कल लढवतील?, याचा काही नेम नाही. अशाच एका पुणेकर पठ्ठ्याने एका मॉलमधून घरी परत जाण्यासाठी लढवलेली शक्कल सध्या चांगलीच चर्चेत आली आहे. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्याने जेवण ऑर्डर करण्यासाठी नाही तर थेट घर गाठण्यासाठी झोमॅटोचा वापर केला आहे. त्यानं लढवलेल्या या शक्कलेला आता पुणेकर चांगलीच पसंती देत आहेत. 


पुण्यात सध्या मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यातच पुण्यात ओला, उबेर किंवा रिक्षा शोधायचं म्हटलं अनेकांना काही दूर चालत जाऊन रिक्षा शोधावी लागते. त्यात रिक्षा चालक शंभारातून सत्तर वेळातर नकारच देतात. ओला, ऊबेर वाहतुकीमुळे लवकर बुक होत नाही आणि परिणामी त्रास सहन करावा लागतो. मात्र पुण्यातील या पठ्ठ्याने या सगळ्यावर चांगलाच पर्याय शोधून काढला. 


सार्थक सचदेवा असं या पठ्ठ्याचं नाव आहे. या सगळ्या संदर्भातील व्हिडीओ त्याने सोशल मीडियावर शेअर केला आहे. सार्थकला घरी जाण्यासाठी ओला, उबेर कॅब बुक होत नव्हती. त्याने बराच वेळ कॅब बुक करण्याचा प्रयत्न केला मात्र त्यानंतर त्याने थेट झोमॅटोवरुन मॉलमधून आपल्या घराचा पत्त्यावर जेवण ऑर्डर केलं. त्यानंतर हे जेवन घेण्यासाठी झोमॅटो बॉय हे जेवन घेण्यासाठी आला आणि या पठ्ठ्याने थेट झोमॅटो बॉयच्या गाडीवर बसून आपलं घर गाठलं. एका रिलमुळे सार्थकची आता नेटकऱ्यांमध्ये चर्चा रंगली आहे. 


शक्कल लढवली अन् रातोरात व्हायरल झाला... 



एका व्हिडीओने रातोरात व्हायरल झालेले लोक आपण बघितले आहेत. कोणी गाण्यामुळे, कोणी आपल्या कलेमुळे कोणी कॉमेडीमुळे तर कोणी नाच करत व्हायरल झाले आहेत. मात्र काही दिवसांपूर्वीच पुण्यातल्या एका मुलाने इस्त्रायलमध्ये भारताच्या झेंड्याची शान राखल्यामुळे व्हायरल झाला होता. सगळ्या सोशल मीडियावर त्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. सर्व स्तरावरुन त्यांचं कौतुक करण्यात आलं होतं. नेत्यांपासून ते अभिनेत्यांपर्यंत सगळ्यांनी त्याचा  व्हिडीओ शेअर केला होता आणि त्याचा अभिमान असल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर आता सार्थकचा हा व्हिडीओ सगळीकडे व्हायरल होताना दिसत आहे. त्याने लढवलेल्या शक्कलेमुळे तो रातोरात्र प्रसिद्ध झाला आहे.  






इतर महत्वाची बातमी-


Pune Roof Top Hotels : पुण्यातील Roof top हॉटेल्स बनतायत डोक्याला ताप; 9 हॉटेल्सवर धडाधड कारवाई