पुणे:  पुणेकरांसाठी महत्वाची बातमी आहे. गुरुवारी पुण्यातील स्वारगेट परिसरातील पाणीपुरवठा बंद (Pune Water Supply) असणार आहे. जलवाहिनीतून होत असलेली गळती थांबवण्याचे काम करण्यासाठी येत्या शुक्रवारी करण्यात येणार आहे.  त्यामुळे  शहरातील काही  भागाचा पाणीपुरवठा (Pune Water Supply) बंद ठेवण्यात येणार आहे. शनिवारी सकाळी उशिरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. त्यामुळे पुणेकरांना गुरूवारी  पाणी साठवून ठेवावं लागणार आहे. 


ससून रुग्णालय परिसरातील  पाण्याची मुख्य जलवाहिनी फुटली आहे. त्यामुळे सदर भागात मोठ्या प्रमाणात पाणी गळती होत असल्या कारणाने महापालिका  प्रशासनाकडून पाणी गळती थांबविण्यासाठी जलवाहिनी दुरुस्तीचे काम केले जाणार आहे. जलवाहिनी दुरुस्तीच्या (Pune Water Supply) कामामुळे शहराच्या मध्यवर्ती भागातील काही पेठांसह  शुक्रवारी (ता.16) पाणी पुरवठा बंद राहणार असल्याची माहिती आहे. दुसऱ्या दिवशी (शनिवारी) सकाळी उशिरा व कमी दाबाने पाणी पुरवठा होणार असल्याची माहिती महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने दिली आहे.


कोणत्या भागात पाणीपुरवठा बंद राहणार?


पुणे स्टेशन परिसर, सोगवार पेठ, मंगळवार पेठ, गारपीर वस्ती, पांढरा गणपती  परिसर, सोमवार पेठ पोलीस लाईन, बरके आळी, सारस्वत कॉलनी, घोडमाळा परिसर, जेथे पार्क, सगून हॉस्पिटल परिसर, गणेश खिंड रस्त्यावरील संचेती हॉस्पिटल ते मोदी बागपर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूचा परिसर, जुना पुणे मुंबई रस्ता, संगम पूल ते मुळा रोड पर्यंत रस्त्याचा दोन्ही बाजूचा परिसर, ताडीवाला रोड झोपडपट्टी व जुना बाजार परिसराचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. 


पाणी जपून वापरण्याचे आवाहन


पुणे महानगरपालिका भागातील रहिवाशांना त्यांच्या दैनंदिन गरजांसाठी पुरेसे पाणी साठवून ठेवण्याचा सल्ला दिला आहे. पाणी कपातीच्या कालावधीत पुणेकर नागरिकांची गैरसोय होणार आहे. पाणी काटकसरीने वापरण्याचे आवाहन केले आहे.  दुरुस्तीच्या कालावधीत पाणीपुरवठा बंद राहणार असल्याने दुसऱ्या दिवशी कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी एक दिवस पुरेल एवढा पाणीसाठा करून ठेवावा, असे आवाहन करण्यात आले आहे. 


हे ही वाचा :


राज्यातील भाटघर, उजनीसह 'ही' धरणे झाली 100% फुल्ल! कोणत्या विभागात काय स्थिती?