पुणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जर्मनी आणि (Uday Samant) ब्रिटन दौरा रद्द झाला. त्यावरुन त्यांच्यावर ठाकरे गटाकडून टीका झाली. आदित्य ठाकरेंनीदेखील यावरुन टीका केली. मात्र मंत्री उदय सामंत यांनी दौरा का रद्द झाला? याची कारणं सांगितली. मुख्यमंत्र्याचं कौतुक करत त्यांनी नागपूरच्या ढगफुटीमुळे आणि राज्यात आंदोलनं सुरू आहे, ही परिस्थिती पाहून मुख्यमंत्र्यांनी दौरा रद्द केला, असं ते म्हणाले. 


दावोस दौरा आणि त्याचा खर्च किती?


आदित्य ठाकरे यांनी उदय सामंत (Uday Samant) यांच्या दावोस दौऱ्यावर आणि मागील दौऱ्यावरील खर्चावरुन टीका केली. त्यावर आता उदय सामंत यांनी खर्च वाचून दाखवत आणि 2022 आणि 2023 या दोन्ही करारांमधील फरक दाखवत अदित्य ठाकरेंवर हल्लाबोल केला. मी कुणाला भेटणार आहे त्यांनी माझ्या सोबत यावं आणि पाहावं. मी सगळा खर्च जनतेसमोर मांडणार आहे. त्यामुळे पत्रकार परिषद घेऊन टीका करु नका. माझ्या दौऱ्याचा अहवाल घ्या, असं ते म्हणाले


त्यासोबतच 2023 च्या दावोस दौऱ्याच्या खर्चाचा लेखाजोगा वाचून दाखवताना ते म्हणाले की, दावोसमध्य़े 40 कोटी नाही 32 कोटी रुपयांचा खर्च झाला. 4 दिवसांची परिषद होती. त्यातच राज्याच्या पॅव्हेलियनसाठी जास्ती भाडे लागलं. पूर्वी झालेल्या परिषदेच्या पॅव्हेलियनपेक्षा चार पट मोठं पॅव्हेलियन होतं. त्यामुळे त्याचा खर्च 16 कोटी रूपये आला आहे. 2023 च शिष्टमंडळदेखील चौपट होतं. खर्च कुणाच्या सांगण्यावरून, ट्विटवरुन झाला नाही तर तो कामाचा झाला. तो खर्च कमीत कमी करण्याचा आमचा प्रयत्न होता, असं स्पष्टीकरण उदय सामंत यांनी दिलं. 


दावोसमध्ये झालेले करार


1 कोटी 37 लाखाचा 2023 मध्ये करार झाला. 2022 मध्ये 80 हजार कोटींचा करार झाला. 2022 मध्ये 80 हजार कोटींमध्ये केवळ 12 हजार कोटींची अंमलबजावणी झाली. त्यात 50 हजार कोटींचा महावितरणचा करार होता. तो करार आता सापडत देखील नाही, असंही ते म्हणाले. रायगडच्या सिनॉर्मस नावाच्या कंपनीचा 20 हजार कोटींचा करार होता आणि बाकी काही करार होते, असे 80 हजार कोटींचा करार झाला होता. 2023 मध्य़े एकूण 19 करार करण्यात आले. 1 लाख 37 कोटी रूपयांचे करार झाले आहेत. या करारांचे 70 टक्के काम पुर्ण झाले आहेत. जमीन वाटपाची प्रक्रियादेखील झाली, असंही त्यांनी सांगितलं. सध्या आपलं राज्य परदेशी गुंतवणुकीत एक नंबरवर आहे. अनेक कोटी रुपयांची गुंतवणूक राज्यात आली आहे.हे मुख्यमंत्री यांच्या प्रयत्नामुळे यशस्वी झालं आहे, असंही ते म्हणाले.


नुसत्या पत्रकार परिषद घेऊन टीका करुन होत नाही


मी स्वतः दावोसला जाऊन आढावा घेणार आहे. ज्यांनी टीका केली आहे की मी कुणाला भेटणार आहे त्यांनी माझ्यासोबत यावं आणि पाहावं. दावोस दौऱ्याचा सगळा खर्च जनतेसमोर मांडणार आहे. एवढ्या खालच्या पथलीवर टीकेवर राजकारण करू नका. नुसत्या पत्रकार परिषद घेऊन टीका करुन होत नाही. माझ्या दौऱ्यावर त्यांनी अहवाल घ्यावा आणि कुणाच्या पैसाने गेलो किती खर्च झाला हे आधी पाहावं, असा हल्लाबोल त्यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर केला आहे. 


हे ही वाचा :


CM Shinde Foreign Tour : काल आदित्य ठाकरेंचा बोचरा वार, आज मुख्यमंत्र्यांनी परदेश दौरा पुढे ढकलला!