मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांचा नियोजित परदेश दौरा (Foreign Tour) पुढे ढकलण्यात आला आहे. आमदार अपात्रतेसंदर्भात (MLA Disqualification) विधानसभा अध्यक्षांसमोरील (Vidhan Sabha Speaker) सुनावणीच्या पार्श्वभूमीवर हा दौरा पुढे ढकलण्यात आल्याची माहिती आहे. हा दौरा नेमका कधी होणार हे अद्याप समजू शकलेलं नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उद्योगमंत्री उदय सामंत (Uday Samant) हे काही प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत 1 ऑक्टोबर रोजी परदेश दौऱ्यावर जाणार होते. इंग्लंड आणि जर्मनी असा दहा दिवसांचा त्यांचा परदेश दौरा होता. परंतु आमदार अपात्रतेसंदर्भात विधानसभा अध्यक्षांसमोरील सुनावणी आणि इतर खासगी कारणांच्या पार्श्वभूमीवर या परदेश दौऱ्यात बदल करण्यात आले आहेत.


दरम्यान मुख्यमंत्र्यांच्या या परदेश दौऱ्यावरुन राजकारण तापलं होतं. ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी या ट्वीट करुन दौऱ्यावर टीका केली होती. त्यानंतर आजच त्याचा हा दौरा रद्द करण्यात आला आहे.


आदित्य ठाकरे काय म्हणाले होते?


"बेकायदेशीर मुख्यमंत्र्यांनी आठवडाभराच्या परदेश दौऱ्याचे नियोजन केलं आहे. आपल्या देशाला आणि राज्याला गुंतवणूक किंवा ओळख मिळवून देणाऱ्या परदेश दौऱ्यांवर माझा आक्षेप नाही. पण हा दौरा देखील त्यांच्या दावोसच्या सहलीसारखा असू नये. ज्या दौऱ्यावर सरकारने 28 तासांसाठी जवळपास 40 कोटी खर्च केले. दावोस दौऱ्यातील कोणत्याही बैठकीचे वेळापत्रक नाही, फोटो नाहीत. दावोस ट्रिपच्या खर्चाचा खरा आकडा सरकार अजूनही लपवत आहे. आता मुख्यमंत्री कार्यालयाने त्यांच्या या 10 दिवसांच्या सहलीचे वेळापत्रक दौऱ्यावर जाण्यापूर्वी जाहीर केले पाहिजे आणि दावोस सहलीसाठी केलेल्या त्यांच्या या बैठकांचे फोटो ट्वीट करणे आवश्यक आहे. एखाद्याच्या सुट्टीसाठी दिवसाचे काम एका आठवड्यापर्यंत वाढवू नये. नाहीतर हा दौरा नव्हे तर करदात्यांच्या खर्चाने केलेली सहलच असेल."






हेही वाचा


Nagpur Flood : ज्यांना मुंबई सांभाळता आली नाही त्यांनी नागपूरवर बोलू नये, नागपूर पुरावरुन टीका करणाऱ्या आदित्य ठाकरेंवर बावनकुळेंचा हल्लाबोल