पुणे: राज्यातील साखर कारखान्याचा गळीत हंगाम दीड महिन्यांपूर्वीच संपला. या गळीत हंगामात 1,322 लाख टन उसाचे गाळप झाले. परंतु अद्याप देखील काही कारखान्यांनी शेतकऱ्यांना त्यांच्या उसाचे पैसे दिले नाहीत. इंदापूर तालुक्यातील कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखान्याने अद्यापपर्यंत शेतकऱ्यांची मार्च आणि एप्रिल मधील उसाची बिले दिली नाहीत. त्यामुळे शेतकरी चिंतातुर आहेत. शेतकरी संघटनेन तर साखर आयुक्तांच्या कार्यपद्धतीवर बोट ठेवले आहे.
राज्यातील साखर कारखान्याचा गळीत हंगाम दीड महिन्यांपूर्वी संपला. परंतु अद्यापही अनेक साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांना त्यांच्या एफआरपी दिली नाही. इंदापूर तालुक्यातील कर्मयोगी सहकारी साखर कारखान्याने देखील काही शेतकऱ्यांची बिले दिली नाहीत. कर्मयोगी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन हे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील आहेत. शेतकऱ्यांना उसाचे पैसे न मिळाल्याने त शेतकरी चिंतातुर आहेत. शेतकऱ्यांना कारखान्याकडून फक्त तारीख पे तारीख मिळत आहे.
या प्रकरणी कारखाना प्रशासनाला विचारले असता. त्यांनी कॅमेऱ्यासमोर बोलण्यास नकार दिला आहे. तर येणाऱ्या 26 जुलै पर्यत सर्व ऊस उत्पादकांना त्यांची बिले मिळतील असे कारखाना प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आलं आहे.
हर्षवर्धन पाटील यांचे वर्चस्व असलेल्या नीरा भीमा सहकारी साखर कारखान्याने मात्र 90 टक्के एफआरपी दिली आहे. 2021- 22 च्या संपलेल्या गळीत हंगामात राज्यातील 199 साखर कारखान्यांनी सहभाग घेतला होता. परंतु 199 पैकी फक्त 90 कारखान्याने शंभर टक्के एफआरपी दिली आहे. तर सर्वात कमी एफआरपी ही राजगड सहकारी साखर कारखान्याने दिली आहे. ती आहे फक्त 49 टक्के. त्यामुळे शेतकरी संघटनेचे नेते पांडुरंग रायते यांनी थेट साखर आयुक्तांच्या कार्यपद्धतीवर बोट ठेवले आहे..
उस कारखान्याला गेल्यापासून 15 दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यात पैसा जमा कारण बंधनकारक असते. पंरतु अद्याप परत अनेक कारखान्यांनी शेतकऱ्यांना त्यांची रक्कम दिलेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचा उदरनिर्वाह कसा होणार असा प्रश्न निर्माण झाला आहे.