पुणे :  पुण्यातील मॉडर्न कॉलेजने आपल्या शैक्षणिक कागदपत्रांची पडताळणी करून प्रमाणपत्र देण्यासाठी टाळाटाळ केल्यामुळे आपल्याला लंडनमधील कंपनीतील नोकरी (Pune Student Prem Birhade Accuses Modern College) गमवावी लागली असल्याचा दावा प्रेम बिऱ्हाडे या तरुणाने केला होता आणि सोशल मीडियावर याबाबातचा व्हिडिओ देखील शेअर केला होता. प्रेम बिऱ्हाडेने प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या शिवाजीनगर येथील मॉडर्न कॉलेज ऑफ आर्ट्स, सायन्स अँड कॉमर्समध्ये २०२०-२३ या कालावधीत बीबीएचे शिक्षण पूर्ण केले. त्याला लंडनमध्ये नोकरी लागली पण ‘मॉडर्न कॉलेजने आपल्या शैक्षणिक कागदपत्रांची पडताळणी करून प्रमाणपत्र देण्यास टाळाटाळ (Pune Student Prem Birhade Accuses Modern College) केल्यानं त्याची नोकरी गेली, त्याने महाविद्यालयाच्या प्रशासनाने जातीय भेदभाव करून व्हेरिफिकेशन केले नाही,’ असा आरोप केला आहे, त्याचा हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आज मॉडर्न कॉलेजच्या प्रशासनाच्या अन्यायकारक वर्तनाचा तीव्र निषेध करत वंचित बहुजन आघाडी प्रणित सम्यक विद्यार्थी संघटनेने कॉलेजसमोर आंदोलन केले. हा विषय जोरदार चर्चेत आल्यानंतर आता प्रा. शामकांत देशमुख, व्हाईस प्रिंसिपल आणि सेक्रेटरी प्रोग्रेसिव्ह एजुकेशन सोसायटी यांनी कॉलेजची बाजू मांडली आहे.(Pune Student Prem Birhade Accuses Modern College)

Continues below advertisement


Prem Birhade Accuses Modern College: शामकांत देशमुख यांनी काय म्हटलंय?


पुण्यातील मॉडर्न कॉलेजवर प्रेम बिऱ्हाडे या विद्यार्थ्याने सर्टिफिकेट दिलं नसल्याचा आरोप केला होता. मात्र कॉलेजकडून हा आरोप फेटाळण्यात आला आहे. आम्ही सगळे सर्टिफिकेट दिले आहेत. शिवाय तिथल्या कंपनीच्या थर्ड पार्टी कंपनीकडून आलेल्या मेलमध्ये ज्या व्हरिफिकेशनच्या गोष्टी आहेत, त्या देखील दिल्या आहेत. त्याची नोकरी गेली नाहीये. नोकरी गेली असती तर थर्ड पार्टी कंपनीचा मेल पुन्हा आला नसता. थर्ड पार्टी कंपनीच्या मेलमध्ये कोणताही डेडलाइन दिली नव्हती, त्यामुळे आम्ही सगळी माहिती गोळा करुन कंपनीला दिली आहे. हे व्हरिफिकेशन फक्त थर्ड पार्टी कंपनी आणि कॉलेजच्या अंतर्गत असते आणि ते गोपनीय असल्याचं मॉडर्न कॉलेजकडून सांगण्यात आल आहे. शिवाय तो ज्या कंपनीत काम करायचं म्हणतोय ती एव्हिएशन (aviation) शी संबंधित आहे. त्यात चुकीची माहिती दिली तर कॉलेजला दोषी ठरवलं जात. त्यामुळे आणि नीट माहिती घेऊनच सगळी प्रक्रिया केली आहे अशी माहिती मॉडर्न कॉलेजचे व्हाईस प्रिंसिपल आणि सेक्रेटरी प्रोग्रेसिव्ह एजुकेशन सोसायटी प्रा. शामकांत देशमुख, यांनी दिली आहे.


Prem Birhade Accuses Modern College: काय आहे प्रकरण?


‘मॉडर्न कॉलेजने आपल्या शैक्षणिक कागदपत्रांची पडताळणी करून प्रमाणपत्र देण्यास टाळाटाळ केल्याने आपल्याला लंडनमधील कंपनीतील नोकरी गमवावी लागली आहे,’ असा दावा प्रेम बिऱ्हाडे या तरुणाने केला, त्याचा व्हिडीओ त्याने सोशल मिडीयावरती शेअर केला होता. ‘महाविद्यालयाच्या प्रशासनाने जातीय भेदभाव करून व्हेरिफिकेशन केले नाही,’ असा आरोपही या तरूणाने केला आहे. दरम्यान, कॉलेजने सर्व आरोप फेटाळले असून, विद्यार्थ्याला प्रमाणपत्र उपलब्ध करून दिल्याचे सांगितले.


Prem Birhade Accuses Modern College: प्रेम बिऱ्हाडेचे २०२०-२३ या कालावधीत बीबीएचे शिक्षण पूर्ण


प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या शिवाजीनगर येथील मॉडर्न कॉलेज ऑफ आर्ट्स, सायन्स अँड कॉमर्समध्ये प्रेमने २०२०-२३ या कालावधीत बीबीएचे शिक्षण पूर्ण केले आहे. त्यानंतर प्रेम बिऱ्हाडे उच्च शिक्षण घेण्यासाठी ब्रिटनमधील ‘युनिव्हर्सिटी ऑफ ससेक्स’मध्ये गेला. या विद्यापीठात प्रवेशासाठी कॉलेजने विद्यापीठाला दोन पत्रे दिली, त्यामध्ये त्यांनी प्रेमबद्दलच्या चांगल्या गोष्टी लिहल्या होत्या. ती पत्र देखील प्रेमने व्हिडीओमध्ये दाखवली आहेत.






काही दिवसांनी प्रेमच्या शैक्षणिक कागदपत्रांची पडताळणी करण्यासाठी लंडनमधील कंपनीने ई-मेलद्वारे कॉलेजला तो तिथेच शिकत होता का? याची विचारणा केली. मात्र, कॉलेजने पडताळणीला टाळाटाळ केल्याने, त्याने स्वत: विभागप्रमुख, उपप्राचार्य आणि प्राचार्यांशी संपर्क साधून याबाबत विचारणा केली, कागदपत्रांची पडताळणी प्रमाणपत्र देण्याबाबत पाठपुरावा केला. मात्र, प्राध्यापकांनी कोणत्या जातीचा आहेस अशी माहिती विचारून, वरिष्ठांच्या आदेशावरून प्रमाणपत्र देता येणार नाही, असे सांगितल्याचं प्रेमने व्हिडीओमध्ये म्हटलं आहे.  प्रेमने त्याच्या सोशल मीडियावर त्याच्यासोबत नेमकं काय घडलं, ते पत्र, कॉलेजने त्याला पाठवलेली नोटीस याबाबतची माहिती दिली आहे.






Prem Birhade Accuses Modern College: या घटनेवर प्रकाश आंबेडकरांचा संताप


या घटनेबाबत प्रकाश आंबेडकरांनी एक पोस्ट लिहून आपला संताप व्यक्त केला आहे. पोस्टमध्ये वंचितचे प्रमुख  प्रकाश आंबेडकर म्हणातात, मॉडर्न कॉलेज ऑफ आर्ट्स, सायन्स अँड कॉमर्सच्या प्राचार्य डॉ. निवेदिता गजानन एकबोटे यांनी त्यांच्या सोशल मीडियावर एक पत्र पोस्ट केले आहे ज्यामध्ये म्हटले आहे की प्रेम बिऱ्हाडे यांना त्यांच्या "विद्यार्थी असतानाच्या दरम्यान असमाधानकारक वर्तन आणि शिस्तबद्ध रेकॉर्ड" मुळे पत्र जारी करण्यात आले नाही. परंतु पत्रात असेही म्हटले आहे की त्यांना यापूर्वी 3 शिफारस पत्रे आणि बोनाफाईड प्रमाणपत्र जारी करण्यात आले होते; प्रेमने यूकेमध्ये प्रवेश प्रक्रियेसाठी वापरले होते. 


जर प्रेम बिऱ्हाडे यांचे वर्तन खरोखरच मॉडर्न कॉलेजमध्ये असताना खरोखरच "असमाधानकारक" होते, तर त्याच कॉलेजने त्यांना बोनाफाईड प्रमाणपत्रासह एक, दोन नव्हे तर तीन शिफारस पत्रे जारी केली हे ती कसे स्पष्ट करेल. हे पत्रे त्यांनी यूकेमधील विद्यापीठात प्रवेशासाठी अर्ज करण्यासाठी वापरले होते.




Prem Birhade Accuses Modern College: मग काय बदलले?


तेव्हा प्रेम बिऱ्हाडे शिफारसीसाठी योग्य का होता, पण आता परदेशात स्थान मिळवल्यानंतर कॉलेजला अचानक त्याचे चारित्र्य समस्याप्रधान वाटते?


प्रामाणिकपणे सांगूया. हे शिस्तीबद्दल नाही. हे अस्वस्थतेबद्दल आहे. दलित विद्यार्थ्याने समाजाने शांतपणे ठरवलेल्या मर्यादा ओलांडण्याचे धाडस केल्याने अस्वस्थता! 


महाविद्यालयाने जे केले आहे ते केवळ अनैतिक नाही, तर ते लक्ष्यित आणि भेदभावपूर्ण कृत्य आहे! हे जातीय पूर्वग्रहात रुजलेले शैक्षणिक नुकसान आहे! त्याच्या यशाचा आनंद साजरा करण्याऐवजी, त्यांनी त्याचा मार्ग रोखण्याचा निर्णय घेतला. 


आपण यालाच जाती-आधारित भेदभाव म्हणायला हवा. आणि ते फक्त चुकीचे नाही, तर ते गुन्हेगारी आहे!