पुणे :  पुण्यासह राज्यातील महत्वाच्या शहरांमधील शाळांची संभ्रमाची घंटा आता थांबली आहे. पहिलीपासूनच्या शाळा सुरु करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला खरा पण त्याला अनेक शहरांमधील स्थानिक प्रशासनानं विरोध दर्शवलाय. त्यानुसार आता  पुणे शहरातील  शाळा उद्यापासून सुरु होणार नाहीत.  पुण्यात पहिली ते आठवीपर्यंतच्या शाळा  15 डिसेंबरपर्यंत बंदच ठेवण्यात येणार आहेत. 


 राज्यातील प्राथमिक शाळा 1 डिसेंबरपासून सुरू करण्याचा निर्णय सरकारने जाहीर केला असला तरी पुण्यात  मात्र, 15 डिसेंबरपर्यंत पहिली ते सातवीच्या सुरूबंदच ठेवण्यात येणार आहेत.  जिल्ह्यातील कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेऊन या संदर्भातील निर्णय 15 डिसेंबरनंतर घेण्यात  येणार आहे. शाळा सुरू होईपर्यंत ऑनलाइन वर्ग सुरूच राहणार असल्याचेही पालिकेने स्पष्ट केले आहे. 


 उद्यापासून टप्प्याटप्प्याने जरी शाळा सुरू करायचं तरी सुद्धा कुठल्या प्रकारच्या सूचना अद्याप न मिळाल्याने शाळेची तयारी झालेली नसल्याचे शिक्षकांनी म्हटले होते.  राज्यात 1 डिसेंबरपासून शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, पुणे महापालिकेने शासन आदेश येऊनही शाळा सुरू करण्याबाबत कोणताही निर्णय घेतला नव्हता. त्यामुळे शिक्षक-पालकांमध्ये संभ्रम तयार झाला होता.


पुणे शहर परिसरातील शाळा सुरू करण्याबाबत आज पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ आणि महापालिका आयुक्त विक्रमकुमार यांच्या एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीमध्ये ओमिक्रॉन विषाणूच्या संस्कार संसर्गाचा संभाव्य धोका लक्षात घेता पुढील तीन दिवस शहरात निर्बंध लागू करण्यात आले आहेत.त्यामुळे महापालिकेच्या शाळा 15 डिसेंबर पासून सुरू करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.


नाशकातील पहिली ते सातवीच्या शाळांचा निर्णय 10 डिसेंबरनंतर होणार आहे. त्याप्रमाणेच औरंगाबाद शहरातील पहिली ते पाचवीच्या शाळा सुरु करण्याचा निर्णयही  10 डिसेंबरनंतर होणार आहे. पण औरंगाबादच्या ग्रामीण भागातील शाळा मात्र उद्यापासूनच सुरु होणार आहेत. त्यामुळे मुंबईसह इतर महत्वाच्या शहरांमधील विद्यार्थी आणि पालकांना तूर्तास तरी दिलासा मिळालाय.  ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर पालकवर्गात भीतीचं वातावरण होतं.


मुंबई, पुणे, नाशिक आणि औरंगाबाद शहरातील शाळा उद्यापासून सुरु होणार नाहीत. मुंबईतील पहिली ते सातवीच्या शाळा 15 डिसेंबरपासून सुरु होणार आहेत. तर नाशिक पालिका हद्दीतील शाळा सुरु करण्याचा निर्णय 10 डिसेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आला आहे. नाशिक पालिका या संदर्भात 10 डिसेंबरला निर्णय घेणार आहे.शाळा सुरू करण्याबाबतचे आदेश सरकारने दिल्यानंतर शिक्षण विभागाने मार्गदर्शक सूचना प्रसिद्ध केल्या आहेत. या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 


Mumbai School reopen date : मुंबईतील शाळा 15 डिसेंबरला सुरु होणार, BMC चा निर्णय - ABP Majha



संबंधित बातम्या :


Mumbai School Reopening मुंबईतील शाळा उद्यापासून नव्हे 15 डिसेंबरपासून सुरू होणार


Pune Coronavirus Update : ओमिक्रॉनच्या धास्तीनं पुण्यात पुन्हा निर्बंध; वाचा सुधारीत नियम


मुंबई महापालिकेच्या लसीकरण मोहिमेवरून नितेश राणे यांचे आदित्य ठाकरे यांना पत्र, म्हणाले...