Pune School News : वाहन चालक आणि अटेंडंट यांचा हलगर्जीपणामुळे (Pune school Bus News) चार वर्षांची मुलगी दोन तास बसमध्ये अडकून पडल्यामुळे बातमी एबीपी माझावर प्रसारित करण्यात आली होती. याच बातमीनंतर शाळा प्रशासन खडबडून जागं झालं आहे.  बस ऑपरेटरने दोघांनाही कामावरून काढून टाकले आहे. शिवाय मुख्याध्यापकांनी बसमध्ये अडकलेल्या चार वर्षांच्या विद्यार्थिनीच्या पालकांची माफी मागितली आहे. बिशप्स को-एड स्कूल, कल्याणीनगरमध्ये ही घटना घडली होती.


वाहन चालक आणि अटेंडंटने यांचा हलगर्जीपणामुळे चार वर्षांची मुलगी दोन तास बसमध्ये अडकल्याची बातमी प्रसारित करण्यात आली होती. ज्यात शाळा प्रशासन आणि वाहन चालक आणि अटेंडंटचा जबाबदारीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलं होते. यानंतर शाळा प्रशासन खडबडून जागं झालं आहे.  शाळेने सर्व विद्यार्थ्यांच्या पालकांना ईमेलद्वारे एक पत्र पाठवले आहे की मुलांच्या सुरक्षिततेची खात्री करण्यासाठी कारवाई करण्यात आली आहे आणि सुधारात्मक उपाययोजना अंमलात आणल्या असल्याचं या पत्रात म्हटलं आहे. 


मुलीचे वडील तरनदीप सिंग यांनी सांगितलं की माझाच्या बातमीनंतर लगेचच बसच्या चालकाला नोकरीवरून काढून टाकण्यात आले. शाळेने आम्हाला ईमेलद्वारे अधिकृत पत्र पाठवले आहे. यात त्यांनी मुलांच्या सुरक्षिततेची खात्री करण्यासाठी कोणती पावले उचलली जाणार आहेत. याची माहिती दिली आहे.  मुख्याध्यापकांनी या घटनेबद्दल खेद व्यक्त केला आणि अशा घटना पुन्हा होणार नाही याची काळजी घेणार असल्याचं त्यात म्हटलं आहे. 


नेमकं काय घडलं होतं?


चार वर्षाच्या मुलीला तिच्या आजीने शाळेत सोडणाऱ्या बसमध्ये बसवून दिलं होतं. त्यानंतर ती बस मुलीला घेऊन शाळेत गेली. मात्र या प्रवासादरम्यान या मुलीला झोप लागली. शाळेत पोहचल्यावर बसमधून बाकी विद्यार्थी उतरले मात्र  ही मुलगी झोपली असल्याने शाळेत पोहचल्यावर उतरली नाही. काही वेळाने तिला जाग आल्यावर तिने आरडाओरड सुरु केली. मात्र शाळेजवळील निर्जन भागात बस उभी असल्याने तिचे रडणे कुणापर्यंत पोहोचले नाही. सुदैवाने शाळेत आपल्या पाल्याला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या एका पालकाने मुलीला बसमध्ये अडकलेले पाहिले. तत्काळ शाळा व्यवस्थापनाला कळवले आणि दुपारी दोनच्या सुमारास मुलीला बाहेर काढण्यात आले. सुमारे तीन तास बसमध्ये अडकली होती. 


शाळेकडून पत्रात देण्यात आलेल्या सूचना-


सुरक्षेच्या उपायांमध्ये खाजगी बस चालविण्यास अधिकृत लोक आणि मुलांची काळजी घेणारे अटेंडंट यांना योग्य काळजी घेण्याचे आदेश दिले आहेत. 


 प्रत्येकाचं ओळखपत्र आणि हजेरी घेतली जाणार आहे. 


बस शाळेत पोहचल्यावर वाहनांची तपासनी करणे.


बसमधून उतरताना आणि चढताना मुलांची काळजी घेणे आणि त्यांच्याकडे लक्ष देणे


संबंधित बातमी-