Pune Rapido News : बाईक टॅक्सी सेवा पुरविणाऱ्या रॅपिडो (rapido) कंपनीच्या संचालकांच्या विरोधात दाखल गुन्ह्यात बंडगार्डन पोलिसांनी कलमवाढ (rikshaw) केली आहे. त्यानुसार रॅपिडो कंपनीच्या (pune) संचालकांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बेकायदा बाईक टॅक्सी शहरात चालवणाऱ्या रॅपिडो कंपनीच्या मूळ मालकांवर गुन्हे दाखल झाले आहेत. 


पुण्यातील रिक्षाचालकांचे अनेक दिवसांपासून बाईक टॅक्सीविरोधात तीव्र आंदोलन सुरु होते. रॅपिडो कंपनीच्या मूळ मालकांवर गुन्हा दाखल झाल्याने आता रिक्षा संघटनांना न्याय मिळेल, अशी आशा बघतोय रिक्षावाला संघटनेचे अध्यक्ष केशव क्षीरसागर यांनी व्यक्त केली. 


मागील अनेक महिन्यांपासून पुण्यात रॅपिडो बाईक टॅक्सीचा सर्रास वापर होत होता. अनेक पुणेकर या बाईक टॅक्सीने प्रवास करायचे. शिवाय बाईट टॅक्सीचं भाडं देखील कमी असल्याने महाविद्यालयीन तरुण बाईक टॅक्सीचा वापर मोठ्या प्रमाणात करत होते. पुणेकरांचा बाईक टॅक्सीचा वापर वाढल्याने पुण्याचील रिक्षाचालकांच्या व्यवसायावर गदा आली. परिणामी त्यांना भाडं मिळणं कठीण झालं. त्यामुळे रिक्षा चालकांनी रॅपिडो बाईक टॅक्सी अॅपवर बंदी घालण्यासाठी रिक्षाचालकांनी चक्का जाम आंदोलन केलं. अखेर त्यांच्या आंदोलनाला यश आलं आहे. 


रॅपिडो असुरक्षित;  जिल्ह्याधिकाऱ्यांनी परवानगी नाकारली


पुण्यातील नागरिकांनी दुचाकी आणि तीन चाकी टॅक्सीचा उपयोग करु नये, अशा सूचना आरटीओकडून करण्यात आल्या आहेत.  दुचाकी आणि तीन चाकी रॅपिडो टॅक्सींना प्रवास वाहतूक करण्याची परवानगी नाकारली आहे. त्यामुळे नागरिकांनी रॅपिडो अॅपचा वापर करुन प्रवास करु नये, असे आदेश जिल्ह्याधिकाऱ्यांनी दिले आहेत. काही दिवसांपासून पुण्यातील रिक्षा चालकांकडून दुचाकीवरुन प्रवासी वाहतूक करण्याच्या निषेधार्थ आंदोलने करण्यात आली होती. त्यांच्या आंदोलनाला यश आलं आहे. रॅपिडोची सेवा बेकायदेशीर असून प्रवाशांच्या सुरक्षित नाही. यामुळे प्रवाशांसाठी हे हानिकारक आहे, असं आरटीओने नमूद केलं आहे. आरटीओने हा अर्ज जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाच्या बैठकीत नाकारला आहे. त्यामुळे आता रिक्षाचालकांना मात्र मोठा दिलासा मिळाला आहे.


रिक्षाचालकांनी मानले आभार


बघतोय रिक्षावाला आणि इतर सर्व सोळा संघटनानांची पोलिसांचे आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयाचे आभार मानले आहेत. पालकमंत्री चंद्रकांत पाटील तसेच नवनियुक्त पोलीस आयुक्त रितेश कुमार साहेब यांचे रॅपिडोविरोधात गुन्हा दाखल केल्याप्रकरणी आभार मानले आहेत. तसेच लवकरच बेकायदा कंपनी राज्यातून हद्दपार झाली तर रिक्षाचलकांना त्यांच्या हक्काचे उत्पन्न मिळेल, अशी आशा रिक्षाचालकांनी व्यक्त केली आहे.