Pune Rain: पुणे जिल्ह्यात काल पावसाचा (Pune Heavy Rain) हाहाकार दिसून आला. आज देखील पुणे शहरासह (Pune Rain) काही जिल्ह्यातील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. दरम्यान आजही पुण्यात अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पुण्यातील घाट माथ्यावरील भागात अतिमुसळधार तर इतर भागांमध्ये मुसळधार ते मध्यम पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला असून ऑरेंज अलर्ट देण्यात आला होता. मात्र आज दिवसभर पावसाने विश्रांती घेतली आहे. त्यामुळे आज पुणे शहर (Pune Rain) परिसरातील जनजीवन पुर्वपदावर आलं आहे. दोन दिवस झालेल्या मुसळधार पावसाने अनेक भागात नागरिकांच्या घरांमध्ये पाणी शिरलं होतं. 


तर पुणे शहरामध्ये आज (शुक्रवार)पासून पावसाचे (Pune Rain) प्रमाण कमी होणार आहे. हवामान विभागाने शहरासाठी ऑरेंज अलर्ट आणि घाटमाथ्यावर रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुढील दोन दिवस ऑरेंज आणि रविवारी (दि.२८) यलो अलर्ट  दिला आहे. गेल्या तीन दिवसांपासून शहरात पावसाची संततधार(Pune Rain) सुरू आहे. गुरुवारी तर पावसाने चांगलाच हाहाकार माजवला होता. 


आज शुक्रवारी (दि.२६) सातारा, रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यात अतिजोरदार पावसाचा रेड अलर्ट दिला. तर सिंधुदूर्ग, कोल्हापूर, पुणे, ठाणे आणि पालघर जिल्ह्यांत काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा (Pune Rain) ऑरेंज अलर्ट दिला आहे. तसेच नाशिक, नंदूरबार, अमरावती, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला. तर इतर भागातही काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज वर्तवला आहे.


उद्या शनिवारी कोकण पुणे जिल्ह्याला जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. रविवारी कोकण आणि मध्य महाराष्ट्रासह घाटमाथा विदर्भातील सर्व जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. दरम्यान आज पावसाने विश्रांती घेतली आहे. पुरस्थिती निर्माण झालेल्या भागामध्ये पाणी ओसरले आहे. जनजीवन पुर्वपदावर येताना दिसत आहे. पुण्यासह पिंपरी,  चिंचवड, लोणावळा या भागांमध्ये देखील पावसाची (Heavy Rain) तुफान बॅटिंग केली आहे. मात्र या भागांमध्ये रात्री पासून पावसाने विश्रांती घेतली आहे. 


गेल्या चोवीस तासांमध्ये तब्बल 239 मिलिमीटर इतका पाऊस बरसला आहे. म्हणजे 9.41 इंच इतका पाऊस कोसळला आहे. या 1 जून पासून 3210 मिलीमीटर इतका पाऊस बरसला आहे, गेल्या वर्षी आजच्या तारखेपर्यंत 2760 मिलीमीटर पावसाची (Heavy Rain) नोंद झाली होती. रात्री पासून पावसाने विश्रांती घेतली असल्याने नागरिकांना काहिसा दिलासा मिळाला आहे.