पुणे : मुंबई, नाशिकनंतर पुण्यालाही पावसाने (Pune Rain) चांगलेच झोडपले आहे. पुण्यात आणि पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आहेय या पावसाने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. या आठवड्यात अवकाळी पाऊस राज्यभर धुमाकूळ घालेल, असा इशारा हवामान खात्याने दिला होता. त्यानुसार राज्यात अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली तर काही ठिकाणी गारपीटदेखील झाली. 


पुण्यातील ग्रामीण परिसरात आंबेगाव, भोर,अवसरी बुद्रुक, मेंगडेवाडी, जारकरवाडी, पोंदेवाडी, खडकवाडी, धामणी, लोणी, वाळुंजनगर, रानमळा, लाखणगाव, काठापुर बुद्रुक,मांदळेवाडी, वडगापीर, शीरदाळे या परिसरात गारपीटीसह मुसळधार पाऊस झाला. त्यासोबतच पुणे शहरातदेखील कात्रज, बालाजी नगर, डेक्कन, कोथरुड, शिवाजी नगर या परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला.  त्यासोबतच पिंपरी चिंचवडलाही अवकाळी पावसाने झोडपले. शहराच्या अनेक भागात आज पावसाने मध्यम तर काही ठिकाणी मुसळधार हजेरी लावली अचानक झालेल्या या पावसाने जनजीवन विस्कळीत झाले. 


पुण्यातील कोणत्या परिसरात किती MM पाऊस?


निमगिरी - 67.0 mm
बल्लाळवाडी -50mm
गिरीवन-39.0mm
डुडुळगाव-8.5mm
लवळे-8.0mm
हवेली-6.5mm
नारायणगाव 33.0mm


आंबेगाव-32.0mm
दौंड-5.5mm
तळेगाव-25.0mm
शिवाजीनगर-5.1mm
एनडीए-17.5mm
वडगावशेरी-5.1mm
हडपसर -16.5
कोरेगाव पार्क-4.0mm
ढमढेरे-16.0mm
राजगुरुनगर -13.0mm
चिंचवड-12.0mm
दापोडी-3.0mm
लवासा-2.5mm
लोणावळा-0.5mm


पुढील काही दिवस वातावरण कसं असेल?


28 नोव्हेंबर- आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होऊन अति हलक्या ते हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे आणि सकाळी धुके पडण्याची शक्यता आहे


29 नोव्हेंबर-आकाश मुख्यतः निरभ्र राहून दुपारी / संध्याकाळी आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे.


30 नोव्हेंबर-रिमझिम / अति हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. धुके पडण्याची शक्यता आहे. 


31 नोव्हेंबर-आकाश मुख्यतः निरभ्र राहून दुपारी / संध्याकाळी आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे.


1 नोव्हेंबर- आकाश मुख्यतः निरभ्र राहून दुपारी / संध्याकाळी आकाश अंशतः
ढगाळ राहण्याची शक्यता आहे. 


2 नोव्हेंबर-आकाश मुख्यतः निरभ्र राहून दुपारी / संध्याकाळी आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे.


 राज्यात कांद्याचे मोठे नुकसान


उन्हाळा कांदा संपून आता लाल कांदा बाजारात यायला सुरुवात झालेली असतांना आज अवकाळी पाऊस व गारपिटीने पुन्हा एकदा चांगलेच झोडपल्याने कांद्याचे मोठे नुकसान झाले आहे. गेल्या तीन महिन्यापासून दुष्काळाची परिस्थिती असतांना कांद्याची लागवड करून वाढवण्यात आला होती. शेतातून कांदे काढायचे अन् बाजारात विकायचे अशी परिस्थिती असतांना अवकाळी पाऊस व गारपिटीने आज शेतकऱ्याचा कांद्यावर घाला घातला.या गारपिटीमुळे शेतातील कांदा सडून शेतकऱ्याच्या हाती काहीच शिल्लक राहणार नाही.त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी हतबल झाला आहे. दरम्यान, गारपिटीमुळे लाल कांद्याचे उत्पादन कमी होऊन भविष्यात पुन्हा ' कांदा ' टंचाई निर्माण होणार आहे.


इतर महत्वाची बातमी-


Unseasonal Rain : राज्यभरात अवकाळी पावसाचा तडाखा; पाऊस आणि गारपिटीमुळे पिकांचं मोठं नुकसान