पुणे : पुण्यात मुसळधार (Pune rain Update) पावसाने हजेरी लावली आहे. पुण्यातील विविध परिसरा ऐन दिवाळीच्या तोंडावर पावसाने अचानक हजेरी लावल्याने पुणेकरांची चांगलीच (Pune Diwali Celebration ) तारांबळ उडाली आहे. अनेक पुणेकर धनत्रयोदशी निमित्त खरेदी करण्यासाठी घराबाहेर पडले होते. मात्र मुसळधार पाऊस पडल्याने पुणेकरांची काही प्रमाणात निशारा झाली. स्वारगेट, सारसबाग, टिळक रोड, डेक्कन, अलका टॉकीज चौक, घोले रोड, शिवाजी नगर, कात्रज, आंबेगाव परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस पडला तर अनेक ठिकाणी पाणीदेखील साचलं आहे.
दिवाळीच्या दिवसात पावासाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली होती. पुण्यासह राज्यभरात काही प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता होती. त्यामुळे पुण्यात आज मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. आज सकाळपासूनच पुण्यात ढगाळ वातावरण होतं. सायंकाळी पुण्यातील काही भागात मुसळधार पाऊस होता.
पिंपरी-चिंचवडमध्ये जोरदार पाऊस...
पिंपरी- चिंचवड शहरांमध्ये अवकाळी पावसाने पिंपरी चिंचवडकर आणि पुणेकरांना झोडपून काढले, दिवाळीची खरेदी करण्यासाठी घराबाहेर पडलेल्या नागरिकांची यामुळे तारांबळ उडाली, सायंकाळी सहाच्या सुमारास अचानक अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली, हवामान खात्याने दिवसभरात पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली होती, सकाळपासूनच ढगाळ वातावरण देखील होते, अखेर सायंकाळी धो- धो पाऊस बरसला, ऐन दिवाळी मध्येच पाऊस कोसळल्याने खरेदी करण्यासाठी बाहेर पडलेले नागरिक मात्र ओलेचिंब झाले.
विविध परिसरात वाहतूक कोंडी
दिवाळीमुळे पुण्यातील बाराजपेठांमध्ये गर्दी आहे. त्यातच पाऊस आल्याने अनेक परिसरात वाहतूक कोंडी झाली होती. घोले रोड, कर्वे रोड, फर्ग्यूसन रोड, लक्ष्मी रोड, सिंहगड रोड या भागात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाल्याचं पाहायला मिळालं. वाहतूक कोंडी झाल्याने नागरिकांची दाणादण उडाली. सुदैवाने या पावसाने कोणत्याही प्रकारची हानी झाली नाही.
पुढील काही दिवस वातावरण कसं असेल?
11 नोव्हेंबर : आकाश अंशतः ढगाळ राहून दुपारी आणि संध्याकाळी आकाश सामन्यात ढगाळ राहण्याची शक्यता. पावसाच्या अति हलक्या सरी पडण्याची शक्यता व सकाळी धुके पडण्याची शक्यता आहे.
12 नोव्हेंबर :निरभ्र राहून दुपारी आणि संध्याकाळी आकाशअंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आणि सकाळी धुके पडण्याची शक्यता आहे.
13 नोव्हेंबर :आकाश मुख्यतः निरभ्र राहण्याची शक्यता आणि सकाळी धुके पडण्याची शक्यता आहे.
14 नोव्हेंबर :आकाश निरभ्र राहण्याची शक्यता
15 नोव्हेंबर :आकाश निरभ्र राहण्याची शक्यता.
16 नोव्हेंबर : आकाश निरभ्र राहण्याची शक्यता.
इतर महत्वाची बातमी-